Solapur : सोलापूरमध्ये MPSC परीक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
सोलापूरमध्ये शांततेत MPSC परीक्षा पार पाडण्यासाठी पोलिस सज्ज
सोलापूर : आज रविवार, ९ नोव्हेंबर रोजी शहरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा होत आहे. त्यासाठी ही परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडावी, यासाठी शहरातील १४ परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ही परीक्षा रविवारी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या दोन सत्रात होत आहे. शहरातील एकूण १४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यात संगमेश्वर कॉलेज रेल्वे लाईन सोलापूर, हिंदुस्तान कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल रेल्वे इन सोलापूर, हरिभाई देवकरण हायस्कूल, संभाजीराव शिंदे प्रशाला जुनी मिल कंपाऊंड, छत्रपती शिवाजी प्रशाला मुरारजी पेठ, एस. आर. चंडक इंग्लिश हायस्कूल बुधवार पेठ,
उमाबाई श्राविका हायस्कूल बुधवार पेठ, श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बाळीवेस, श्री सिद्धेश्वर बाल मंदिर माध्यमिक स्कूल भवानी पेठ, के. एल. ई. अण्णाप्पा काडादी हायस्कूल भवानी पेठ, सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक भवानी पेठ, रूपा भवानी रोड सोलापूर, दयानंद काशिनाथ आसावा हायस्कूल भवानी पेठ, कुचन हायस्कूल ज्युनियर कॉलेज रविवार पेठ तसेच एसव्हीसीएस हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज एमआयडीसी अक्कलकोट रोड, सोलापूर या शहरातील १४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दिली जाणार आहे.
याबाबत पोलिसांकडून परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधित आदेश करण्यात आला आहे. हा आदेश सकाळी ७.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात लागू असणार आहे. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे.