आयफोन विक्रीने महसूलात दमदार वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीमध्ये आयफोन निर्माती कंपनी अॅपलने 119.6 अब्ज डॉलर्स इतका महसूल प्राप्त केला आहे. सदरचा महसूल हा मागच्या तुलनेमध्ये 2 टक्के वाढीव आहे.
अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी भारतातील उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे महसुलामध्ये चांगली वाढ करता आली असल्याचे म्हंटले आहे. आगामी काळातही कंपनी प्रगतीपथावर राहिल असा विश्वास त्यांना आहे.
एक वर्षाच्या आधी पाहता कंपनीने 65.77 डॉलर्सचा महसूल प्राप्त केला होता. कंपनीने मलेशिया, मेक्सिको, फिलिपिन्स, पोलंड, तुर्किये आणि इंडोनेशिया आदी देशांमध्येसुद्धा फोन विक्रीच्या माध्यमातून विक्रमी महसूल प्राप्त केला आहे. अॅपल 2023 मध्ये सर्वाधिक महसूल प्राप्त करत भारतीय बाजारामध्ये आघाडीवर राहिली आहे. अॅपलने एक कोटीपेक्षा अधिक फोन्सची शिपमेंट केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एखाद्या कॅलेंडर वर्षामध्ये पहिल्यांदाच महसुलामध्ये विक्रमी कामगिरी नोंदवली असल्याचेही सीईओ कुक यांनी म्हटले आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीमध्ये मात्र कंपनीच्या आयपॅडची विक्री घसरलेली दिसून आली. आयपॅड विक्रीत 25 टक्के घट होऊन 7.7 अब्ज डॉलरची विक्री झाली आहे. सदरच्या तिमाहीत वेअरेबल उत्पादने, होम अँड अॅक्सेसरीज सेगमेंटमधील उत्पादने वर्षाच्या आधारावर पाहता अकरा टक्के घसरणीसह 11.95 अब्ज डॉलरची विक्री झाली आहेत.