महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तालुक्यात मृग नक्षत्राची जोरदार एंट्री

10:22 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /किणये 

Advertisement

तालुक्यात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार एन्ट्री केली आहे. दोन दिवसापासून दमदार पाऊस झाला यामुळे शेत शिवारात पाणी साचले आहे तसेच अधिक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील कामे लांबणीवर पडली आहेत. यापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस झाला तसेच दोन दिवसापासून मृगनक्षत्राने जोर घेतला आहे. त्यामुळे शिवारात अधिक प्रमाणात पाणी साचले आहे त्यामुळे बहुतांशी शिवारातील भातपेरणी खोळंबलेली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी सकाळपासूनच पावसाला सुऊवात झाली. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती.  या पावसामुळे  नदी नाले प्रवाहित झाले आहेत. दरवर्षी अठरा ते वीस मे च्या दरम्यान शेतकरी पेरण्या करतात यंदा मात्र त्या कालावधीतच मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यामुळे पेरणी लांबणीवर पडली. शेतकऱ्यांनी येत्या दोन दिवसात पेरणी करण्याचे नियोजन केले होते मात्र अधिक पाऊस झाल्यामुळे पेरणीची कामे लांबणीवर पडली आहेत. पश्चिम भागातील मुंगेत्री नदीला पाणी आले आहे. तसेच नाले सुद्धा प्रवाहीत झाले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article