महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जपानला भूकंपाचा जोरदार धक्का

06:58 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्षमता 7.6 रिश्टर, सुनामीचा इशारा, सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना

Advertisement

वृत्तसंस्था / टोकियो

Advertisement

जपान देशाला नववर्षाच्या प्रथम दिनीच 7.6 रिश्टर क्षमतेचा प्रचंड भूकंपाचा धक्का बसला आहे. या धक्क्यामुळे सुनामी येण्याचा धोका असून लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मुख्य धक्क्यापाठोपाठ आणखी 20 छोटे धक्के बसल्याने संपूर्ण देशातच अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. भूकंप क्षेत्रात एक अणुभट्टीही असल्याने अधिक सावधानता बाळगण्यात येत आहे. भूकंपक्षेत्रातील सागर तटाला सुनामी धडकल्याचे वृत्तही देण्यात आले आहे.

या भूकंपात अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, 100 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे साधारणपणे 4 वाजता हा हादरा बसल्याची माहिती देण्यात आली. भूकंपापाठोपाठ समुद्रात सुनामीची चिन्हे दिसू लागली. प्रारंभी दोन मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. नंतर त्यांची उंची 17 फुटांपर्यंत वाढली. ही सुनामीच असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच नागरिकांना त्वरित सुरक्षितस्थळी आसरा घेण्याचा संदेश देण्यात आला.  त्यानुसार साधारणत: 1 लाख लोकांनी उंचावरच्या स्थानी स्थलांतर केले आहे.

मालमत्तेची हानी 

जपानच्या पश्चिम सागरतटावरील निगाता येथे मोठी सुनामी येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यामुळे प्रशासनाने दक्षतेचे उपाय भूकंप होताक्षणीच केलेले होते. नागरिकही स्वत:च्या सुरक्षेसाठी स्वबळावर प्रयत्न करीत होते. सोमवारी रात्री उशीरापर्यंत सुनामीच्या धोक्याचे इशारे देण्यात येत होते. या सुनामीत सागरतटानजीकच्या प्रदेशात पायाभूत सुविधांची हानी झाली आहे. काही इमारती कोसळल्या असून सागरतटानजीकच्या अस्थायी बांधकामांची हानी झाली आहे.

राजधानीच्या नजीक केंद्र

या भूकंपाचे केंद्र जपानची राजधानी टोकियोच्या नजीक भूमीखाली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे टोकिओ शहरालाही सुनामीचा इशारा देण्यात आला होता. टोकिओमधील सर्व उंच इमारती सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. सोमवारी संध्याकाळी प्रशासनाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत भूकंप आणि साहाय्यता याविषयी माहिती देण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षेचाही आढावा प्रशासनाने घेतला आहे.

अणुभट्टीला धोका नाही

भूकंप झाला त्या क्षेत्रात टोकिओ इलेक्ट्रिक पॉवर कंपनीचे अणुवीज केंद्र आहे. भूकंपानंतर त्वरित या अणुकेंद्राची सूक्ष्म तपासणी करण्यात आली. मात्र, त्याला कोणताही धोका झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी रात्री उशीरापर्यंत अणुकेंद्राचे सर्वेक्षण करण्यात येत होते. काही धोका दिसून आला आहे. भूकंपाचे केंद्र ‘रिंग ऑफ फायर’ नामक क्षेत्रात होते. या क्षेत्रात भूकंप झाल्यास तो जास्त विनाशकारी आणि धोकादायक मानला जातो. मात्र, मोठ्या हानीचे वृत्त नाही.

अणुभट्टीस्फोटाच्या आठवणी ताज्या

हा भूकंप आणि त्यापाठोपाठ आलेल्या सुनामीमुळे 2011 मध्ये फुकुशिमा येथे अणुभट्टीचा स्फोट झाल्याच्या घटनेची आठवण ताजी झाली आहे. त्या अणुभट्टी स्फोटात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्ता हानी झाली होती. पण त्यानंतर जपानच्या सरकारने इतर अणुभट्ट्यांची सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली होती. याचा लाभ यावेळी झाल्याचे दिसून येत आहे. अणुभट्टीला धोका न झाल्याने जीवितहानी टळली आहे, अशी माहिती सोमवारी रात्री देण्यात आली आहे.

विशिष्ट रचनेमुळे हानी कमी

जपानचा मोठा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. तेथे केव्हाही मोठे भूकंप तसेच सुनामीचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे या संपूर्ण देशातच घरे आणि इमारती यांची रचना विशिष्ट प्रकारे केलेली असते. त्यामुळे चाळीस किंवा त्याहीपेक्षा अधिक मजल्यांच्या इमारतीही पूर्णत: सुरक्षित राहतात. याच कारणामुळे एवढा मोठा भूकंप होऊनही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप मिळालेले नाही.

जोरदार धक्क्यानंतर सुनामी

ड जपानच्या पश्चिम सागरतटावर आदळली सुनामी, मोठ्या प्रमाणात हानी

ड प्रशासनाकडून त्वरित साहाय्यता कार्यास प्रारंभ, जीवितहानीचे वृत्त नाही

ड अणुकेंद्रांची कडेकोट सुरक्षा, भूकंप-सुनामीचा परिणाम नसल्याची माहिती

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article