महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पट्टेरी वाघाची मोटरसायकलवर झडफ ; डेगवेतील ग्रामपंचायत सदस्य गंभीर जखमी

03:30 PM Dec 07, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

डेगवे - वराडकरवाडी येथे पट्टेरी वाघाने मोटरसायकलवर झडफ घातल्याने डेगवे ग्रामपंचायत सदस्य राजेश नारायण देसाई हे गंभीर जखमी झाले आहेत . त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर सावंतवाडी येथील डॉक्टर खटावकर यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेश देसाई हे मळगाव येथे शुक्रवारी रात्री पत्नी वर्षा ,मुलगा समर्थ यांच्यासह मोटर सायकलने डेगवे मोयझरवाडी येथून जत्रेला जात होते. डेगवे - वराडकरवाडी येथे आले असता त्यांच्यावर पट्टेरी वाघाने झडप घातली त्यामुळे मोटरसायकल पलटी झाली. त्यावेळी सर्वांनी एकच आरडाओरड केला . मागून येणाऱ्या मोटरसायकलस्वारांनी आरडाओरड सुरुवात केली. त्यामुळे पट्टेरी वाघाने धूम ठोकली . जखमी झालेल्या राजेश देसाई यांना सरपंच राजन देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई ,चंद्रकांत परब यांनी त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. यासंदर्भात वनविभागालाही कळवण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ पट्टेरी वाघ वनविभागाला आढळले आहेत. सह्याद्रीच्या पट्ट्यात आंबोली ते मांगेली पर्यंतच्या परिसरात हे वाघ आढळले आहेत . त्यात दिगवे गावही येतो. पट्टेरी वाघाच्या या हल्ल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने यात लक्ष घालावे तसेच राजेश देसाई यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मधुकर देसाई यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news # news update # striped tiger
Next Article