मिरज सिव्हिलच्या डॉक्टरांचा संप
05:31 PM Sep 18, 2025 IST | Radhika Patil
Advertisement
होमिओपॅथी डॉक्टरांना एमएमसी नोंदणीस परवानगी दिल्याचा निषेध
Advertisement
मिरज :
होमिओपॅथी डॉक्टरांना सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केवळ सहा महिन्यांत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीचा डॉक्टरांकडून निषेध करण्यात आला.
Advertisement
गुरुवारी मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी संप आंदोलन करत आपला विरोध नोंदवला. या आंदोलनात ‘असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या माध्यमातून सर्व डॉक्टर सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान राज्य सरकार व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी आपली मागणी उपवैद्यकीय अधीक्षकांना लिखित निवेदनाद्वारे सादर केली.
या आंदोलनामुळे शासकीय रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर विभागांचे कामकाज बाधित झाले.
Advertisement