कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कठोर अन् निर्णायक कारवाई करणार!

06:50 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
New Delhi, May 03 (ANI): Prime Minister Narendra Modi meets Angola President Joao Manuel Goncalves Lourenco, in New Delhi on Saturday. (ANI Photo)
Advertisement

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सोडणार नाही : पंतप्रधानांची घोषणा : अंगोलाच्या राष्ट्रपतींशी चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. अंगोलाच्या राष्ट्रपतींच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांनी पाकिस्तानला पुन्हा कडक शब्दात ठणकावले. ‘आम्ही दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यास वचनबद्ध आहोत. सीमापार दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मॅन्युएल गोन्साल्विस लॉरेन्को यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठकही झाली. मी राष्ट्रपती लॉरेन्को आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात मनापासून स्वागत करतो. हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

संयुक्त पत्रकार परिषदेचे निवेदन प्रसिद्ध करताना पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय संबंधांबद्दल भाष्य केले. 38 वर्षांनंतर अंगोलाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे भारत-अंगोला संबंधांना नवी दिशा आणि गती तर मिळतेच, शिवाय भारत-आफ्रिका भागीदारीही बळकट होते, असे स्पष्ट केले. याप्रसंगी पंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सांगत यावर आपण एकजूट दाखवण्याची गरज व्यक्त केली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती लॉरेन्को आणि अंगोलाने व्यक्त केलेल्या शोकसंवेदनेबद्दल आभार व्यक्त केले.

अंगोलाला मदतीची घोषणा

‘अंगोलाच्या सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी 200 दशलक्ष डॉलर्सची संरक्षण क्रेडिट लाइन मंजूर करण्यात आल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संरक्षण प्लॅटफॉर्मची दुरुस्ती आणि पुरवठा यावरही चर्चा झाली. अंगोलाच्या सशस्त्र दलांच्या प्रशिक्षणात मदत करण्यास आम्हाला आनंद होईल, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article