सात दुकानांवर महापालिकेची कडक कारवाई; एकल प्लास्टिक वापरासाठी 28 हजार रुपये ठोकला दंड
मिरजमध्ये ७ दुकानांवर महापालिकेची कडक कारवाई
मिरज : प्रतिबंध असलेले एकल प्लास्टीक वापरणाऱ्या शहरातील सात करुन दुकानांवर कारवाई महापालिकेने २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. स्वच्छा सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. व्यवसायिकांनी चंदी असलेते प्लास्टीक वापरल्यास कड़क कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
निसर्गाला हानिकारक असलेल्या एकल प्लास्टीकवर शासनाने बंदी घातली असताना शहरातील काही दुकानांमधून एकल प्लास्टीकचा सर्रास वापर सुरू असल्याचे निदर्शनास आत्ते होते. आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानंतर आयुक्त सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी सचिन वाघमोडे, स्वच्छता निरीक्षक अक्षय कोलप, नितीन कांबळे,महेश कांबळे, मनोज हरिजन आणि पंकज गोंधळे या कर्मचाऱ्यांच्या पथकाने संबंधित दुकानात सर्व्हे केला.
,
यावेळी संबंश्रित सात दुकान व्यवसायिक वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी एकल प्लास्टीकचा वापर करीत असल्याचे दिसून आले. महापालिका पथकाने संबंधीत व्यवसायिकांवर कारवाई करुन २८ हजारांचा दंड वसूल केला. दंडाच्या पावत्या जाग्यावरच देण्यात आल्या ही कारवाई दंडात्मक नसून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी उचललेले पाऊल आहे. पर्यावरण प्रदूषण, कचरा वाढ व नालाबंदीवर आळा घालण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.