कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडिगो गोंधळावर कठोर कारवाईला प्रारंभ

06:55 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंपनीच्या चार महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

इंडिगो कंपनीने आपल्या प्रवासी विमानसेवेत सलग 10 दिवस घातलेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे आता कंपनी विरोधात कठोर कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे. या गोंधळाच्या काळात कार्यरत असणाऱ्या चार महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी स्वत: लक्ष घालून ही कारवाई केली आहे.

गुरुवारी भारतीय विमान प्रवास नियंत्रण प्राधिकरणाने (डीजीसीए) इंडिगोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. या बैठकीत एल्बर्स यांना या गोंधळासंबंधी आणि त्याच्या उत्तरदायित्वासंबंधी अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच कंपनीची वैमानिक नियुक्त करण्याची प्रक्रिया काय आहे, यासंबंधीही विचारणा करण्यात आली होती. गेल्या दहा दिवसांमध्ये भारतातील या मोठ्या प्रवासी विमान सेवा कंपनीची हजारो उ•ाणे अचानक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे लक्षावधी प्रवाशांचे हाल झाले होते. केंद्र सरकारने आणि डीजीसीएने या गोंधळाची गंभीर दखल घेतली असून गोंधळाचे उत्तरदायित्व निश्चित करा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करा, असा स्पष्ट संदेश कंपनीला देण्यात आला होता.

चार अधिकारी उत्तरादायी

या गोंधळाच्या काळात कंपनीचे चार अधिकारी कंपनीच्या संपूर्ण हालचालींचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि कामातील ढिसाळपणामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडले होते. पहिल्या एक-दोन दिवसांमध्येच परिस्थितीवर नियंत्रण आणता येणे शक्य होते. तथापि, या अधिकाऱ्यांनी तशी दक्षता न घेतल्याने लक्षावधी प्रवाशांना नाहक त्रासाला तोंड द्यावे लागले, असे प्राथमिक चौकशीत आढळले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली.

वैमानिकांची कमतरता ?

कंपनीने विमान उ•ाणांची संख्या वाढविली आहे. मात्र, त्या तुलनेत वैमानिकांची  संख्या वाढविण्यात आलेली नाही. केंद्र सरकारच्या नव्या नियमांच्या अनुसार प्रत्येक वैमानिकाला आठवड्यात एक दिवस सुटी देणे अनिवार्य करण्यात आले आहे. वैमानिकांची संख्या कमी पडल्याने अनेक उ•ाणे रद्द करावी लागली, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कंपनीला वैमानिक नियुक्तीची प्रक्रिया स्पष्ट करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच, वैमानिकांची संख्या पुरेशी ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच कंपनीची 10 टक्के उ•ाणे कमी करण्याचा आदेश दिला गेला आहे. कंपनीने या आदेशाचे पालन करण्यास त्वरित प्रारंभ केलेला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडूनही आढावा

इंडिगो गोंधळाची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली असून त्यांनी प्रवासी विमान नियंत्रक आणि प्रवासी विमान क्षेत्राशी संबंधित विविध विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी चर्चा केली होती. या अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकारासंबंधी त्यांना माहिती दिली होती. तसेच कंपनीच्या विरोधात प्रस्तावित असणाऱ्या कारवाईची माहितीही त्यांना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article