For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तणाव निवारण शिबिर

10:16 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तणाव निवारण शिबिर
Advertisement

बेळगाव : महिला पोलीस व अधिकाऱ्यांची शारीरिक व मानसिक ताकद वाढविण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने गुरुवारी भ्रामरी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस मुख्यालयात झालेल्या या शिबिरात बेळगाव शहर व उत्तर विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या 214 महिला पोलीस व अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक व प्रभारी पोलीस आयुक्त विकाशकुमार विकाश यांच्या पुढाकारातून हे शिबिर भरविण्यात आले. या शिबिरात गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्यासह अनेक महिला अधिकाऱ्यांनीही भाग घेतला होता.पोलीस दलात सेवा बजावताना येणारा ताणतणाव दूर करून महिला पोलिसांची ऊर्जा वाढविण्यासाठी यु. एफ. अकादमी फाऊंडेशन आणि बजाज कॅपिटल फाऊंडेशन यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शारीरिक व मानसिक संतुलन राखणे आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. रवीश धमिजा व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला पोलिसांना मार्गदर्शन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.