हट्टीहोळ गल्लीतील पथदीप आठ दिवसांपासून सुरूच
12:12 PM May 28, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : हट्टीहोळ गल्ली शहापूर येथील बेकवाड बाँड रायटर यांच्या ऑफिससमोरील पथदीप मागील आठ दिवसापासून सतत सुरू आहे. स्थानिकांनी हेस्कॉम तसेच महापालिकेला कळवूनदेखील दखल घेतलेली नाही. यामुळे विजेचा अपव्यय सुरू असून प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शहरात अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी पथदीप बंद व दिवसा सुरू अशी स्थिती पहायला मिळते. यामुळे विजेचा अपव्यय होत असून नाहक वीज बिल भरावे लागते. हट्टीहोळ गल्लीतही अशाच प्रकारे पथदीप सुरू असल्याने स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article