महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव- उचगाव-कोवाड मार्गावर कुत्र्यांचा वावर : प्रवाशांत भीती

10:43 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/उचगाव 

Advertisement

उचगाव परिसर आणि बेळगाव-बाची तसेच उचगाव-कोवाड या मार्गावरील उचगाव फाटा ते बेकिनकेरे या परिसरात भटक्मया कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. अनंतचतुर्दशी दरम्यान दुचाकी वाहनांच्या आडवी कुत्री आल्याने वाहनचालक पडून गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या परिसरात भटक्मया कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून यावर शासनाने, तसेच संबंधितांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगाव ते शिनोळी फाट्यापर्यंत अनेक मांसाहारी खानावळी, हॉटेल्स असल्याने टाकाऊ पदार्थ खाण्यासाठी कुत्र्यांची अक्षरश: झुंबड उडते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकण्यात येत असल्याने टाकाऊ पदार्थ खाण्यासाठी देखील कुत्र्यांचे कळप धावत सुटतात आणि यामध्ये वाहनचालकांच्या आडवी कुत्री येत असल्याने वाहनासह पडून गंभीररित्या जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर कुत्र्यांचे कळप दुचाकीचालकांवर हल्ले करून जखमी करण्याच्या घटना वरचेवर घडत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तरी शासनाने व ग्रा.पं.ने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article