सांगलीत मोकाट प्राण्यांचा सुळसुळाट
सांगली :
सांगलीत मोकाट प्राण्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. रस्त्यांवर मोकाट कुत्रे, बैल, घोडे आणि अन्य प्राणी मुक्त संचार करत आहेत. या प्राण्यांमुळे अपघात, आणि जीवितहानीसारख्या घटना घडत असूनही महापालिकेचा याकडे गांभीर्याने पाहण्याचा प्रयत्न दिसत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये अरवरथता आहे.
नुकतीच संजयनगर भागात घरात झोपलेल्या महिलेवर दिवसा मोकाट कुत्र्याने हल्ला केला. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल केले. हल्ला इतका भीषण होता की हातावर अनेक टाके घालावे लागले. यापूर्वीच, मागील आठवड्यात सांगलीतील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते बन्सीलाल कदम यांना रस्त्त्यावर मोकाट फिरणाऱ्या बैलाने धडक दिली होती. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अशा घटनांमुळे नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे.
प्रशासनाचा निष्काळजीपणा व उपाय योजनांचा अभाव आहे. मोठी दुर्घटना घडल्यावरत्न प्रशासनास जाग येणार का असा सवाल होत आहे. विविध भागांत दररोज मोकाट प्राण्यांचा वावर वाढत असून, वाहनधारक, शाळकरी मुले, वृद्ध, महिलांना त्रास होत आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी ररत्यांवर चालणे धोकादायक बनले आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही. महापालिकेने याआधी कुत्र्यांच्या त्रासावर उपाय म्हणून नसबंदी मोहिमा राबवल्या, पण त्या अर्धवट राहिल्यामुळे परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. बैल, घोडे, इतर जनावरांना पकडण्यासाठी खारा पथक असायला हवे, पण आजवर कुठलीही ठोस व्यवस्था नाही.
मोकाट कुत्र्यांमुळे फक्त अपघातच नाही, तर रेबीज (हायड्रोफोबिया) सारख्या रोगांचा धोकाही DAY आहे. याप्राण्यांकडून कुजलेले अन्नखाणे, कचऱ्याचे प्रमाण वाढणे हे प्रश्नही धोका निर्माण करत आहेत
सांगलीतील नागरिक, सामाजिक संस्था, आणि स्थानिक कार्यकर्ते आता एकत्र येऊन या समस्येला वाचा फोडत आहेत, तरीही मनपाचा कारभार ढीम्म आहे. संजयनगर, गणेशनगर, हरिपूर रोड आणि इतर परिसरांमध्ये नागरिकांनी महापालिकेचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे. त्वरित उपाय व्हावेत, अशी मागणी केली आहे.
- लक्ष गरजेचे...!
"मोकाट प्राण्यांच्या वाढत्या संख्येवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लवकरच विशेष मोहीम राबवून कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी करावी. तसेच मोकाट घोडे, गायी, बैलांबाबतही कारवाईसाठी स्वतंत्र योजना आखली जावी. नागरिकांचा रोष लक्षात घेता या केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष कृती होण्याची अपेक्षा आहे. - प्राणीमित्र