येथे माशांचा अजब प्रकार
कळल्यावर बसणार नाही विश्वास
माणसांना गीत-संगीत अत्यंत पसंत आहे. परंतु अनेक प्राण्यांनाही संगीत ऐकणे आवडत असल्याचे तुमच्या ऐकिवात असेल. पण एका देशात मासे देखील गात असतात. ग्रीनलँड हा देश आर्क्टिक आणि अटलांटिक महासागरादरम्यान असलेला अत्यंत सुंदर देश आहे.
या ग्रीनलँडच्या समुद्रात मासे परस्परांमध्ये भरपूर संभाषण करतात. 2010 ते 2015 पर्यंत वैज्ञानिकांनी या माशांवर संशोधन केले आणि समुद्रात मायक्रोस्कोप लावून त्यांचा आवाज रिकॉर्ड केला आहे. या रेकॉर्डिंगदरम्यान मासे विविध प्रकारचे आवाज काढत असल्याचे कळले. यादरम्यान अंडरवॉटर मायक्रोस्कोपद्वारे माशांचा आवाज ध्वनिमुद्रित करण्यात आला.
प्रथम मासे केवळ परस्परांमध्ये संभाषण करत असल्याचे वैज्ञानिकांना वाटले, परंतु नंतर माशांच्या आवाजा संग्रह वाढत गेल्यावर हा माशांच्या गाण्याचा आवाज असल्याचा विश्वास वैज्ञानिकांना झाला. व्हेलच्या आवाजात गायकांप्रमाणे उतारचढाव देखील आढळून आला आहे. वैज्ञानिकांनी यादरम्यान माशांची एकूण 184 गाणी रिकॉर्ड केली आहेत