For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जर्मनीत मिळाली अजब गोष्ट

06:04 AM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
जर्मनीत मिळाली अजब गोष्ट
Advertisement

दांपत्याला विभक्त करण्याचा मंत्र नमूद

Advertisement

उत्तर जर्मनीत पुरातत्व तज्ञांनी अलिकडेच एका रहस्यमय कलाकृतीचा शोध लावला आहे. ही कलाकृती 15 व्या शतकातील असल्याचे त्यांचे मानणे आहे. हा एक ‘अभिशात टॅबलेट’ असून तो प्राचीन काळात प्रेम आणि ईर्ष्येच्या प्रतिकापेक्षा कमी नव्हता. हा टॅबलेट शिसच्या एका छोट्याशा स्लॅबद्वारे तयार करण्यात आला होता. 15 व्या शतकातील गुप्त कलाकृतीवर एक अभिशात असून त्याचा उद्देश जोडप्यांना विभक्त करणे होता असे संशोधकांचे सांगणे आहे. मध्ययुगीन टॅबलेट किनारी शहर रोस्टॉकमध्ये एका निर्मितीकार्यावेळी सापडला आहे.

अशाप्रकारचे शापित टॅबलेट अशा ठिकाणी लपविले जायचे, जेथे त्यांचा शोध घेणे अशक्य ठरेल. संशोधकांनी या धातूच्या तुकड्याला साफ केल्यावर त्यांना गॉथिप लिपीत एक हस्तलिखित संदेश मिळाला असून तो सहजपणे वाचणे शक्य नव्हते. या संदेशाद्वारे तलेके नावाची महिला आणि हेनरिक नावाच्या पुरुषाला लक्ष्य करण्यात आले होते. सथानास तालेके बेलजेबुक हिनरिक बेरिथ असे यावर लिहिले होते. संशोधकांनी याची व्याख्या या जोडप्याच्या विरोधात सैतान आणि राक्षसी आत्मा बेरीथला पाचारण करणे अशी केली आहे. तालेके आणि हेनरिक यांचे नाते कुणीतरी संपुष्टात आणू पाहत होता. कदाचित हे नाकारलेले प्रेम आणि ईर्ष्येविषयी असू शकते. प्रत्यक्षात हा टॅबलेट अत्यंत विशेष शोध होता असे या उत्खननाचे नेतृत्व करणारे जोर्ग अंसोरगे यांनी सांगितले आहे.

Advertisement

रोस्टॉकमध्ये मिळालेली शाप पट्टिका सर्वसाधारणपणे प्राचीन ग्रीस आणि रोमशी निगडित आहे. अभिशाप पट्टिका सर्वसाधारणपणे ख्रिस्तपूर्व 800 ते 600 सालापर्यंत प्रचलित होती. परंतु आम्हाला मिळालेली पट्टिका ही 15 व्या शतकातील असू शकते. यापूर्वीही अशाप्रकारच्या शापित पट्टिका पुरातत्वतज्ञांना मिळत राहिल्या आहेत. इस्रायनच्या प्राचीन थिएटरमध्ये देखील एक पट्टिका मिळाली होती,  ज्यात 1500 वर्षे जुन्या टॅबलेटवर ग्रीक शिलालेख होता. प्रतिस्पर्धी नर्तिकेला नुकसान पोहोचविण्याचा यात उल्लेख होता अशी माहिती अंसोरगे यांनी दिली आहे.

Advertisement

.