महाविद्यालयात सापडला अजब सांगाडा
माणसांसारखे हात, परंतु शरीर प्राण्याचे
2018 साली अशा ममीचा शोध लागला होता, ज्याविषयी वैज्ञानिकांना फारशी माहिती मिळविता आलेली नाही. ही एक अजब प्राण्याची ममी असून त्याविषयी वैज्ञानिक अधिक संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका जुन्या भवनात एक रहस्यमय ममीकृत जीव मिळाल्याने वैज्ञानिक चकित झाले. या अजब जीवाला विद्यापीठाच्या कॅम्पस ऑर्कियालॉजी प्रोग्रामकडून अस्थायी स्वरुपात ‘कपाकाब्रा’ नाव देण्यात आले आहे. हे नाव प्रसिद्ध लोककथेच्या पिशाच्चासारखा प्राणी चुपाकाब्राने प्रेरित आहे. हा विचित्र जीव युनिव्हर्सिटीच्या कुक-सीवर्स हॉलच्या दुरुस्तीदरम्यान 2018 मध्ये मिळाला होता. ही इमारत 1889 मध्ये निर्माण करण्यात आली होती. याचमुळे हा जीव त्यापूर्वीचा नसावा असा विश्वास वैज्ञानिकांना आहे.
पीएचडी विद्यार्थिनी जेरियल कार्टालेसला युनिव्हर्सिटी ऑफ डंडीमधून मास्टर डिग्री प्राप्त आहे. तीच आता या रहस्याची उकल करू पाहत आहे. हा प्राणी आकारात छोट्या मांजरासारखा आहे, परंतु याचे शेपूट अत्यंत लांब आहे. याचे हात ज् माणसासारखे आहेत, पाच बोट, नखं आणि पूर्ण रचना मानवी हातांसारखी आहे. याची त्वचा अत्यंत पातळ म्हणजेच जुन्या कागदासारखी आहे. याचे कान अन् नाक अद्याप असले तरीही पूर्णपणे सुकलेले आणि धुळीने भरलेले आहेत असे कार्टालेसने सांगितले.
या जीवाची एक्स-रे तपासणी करण्यात आली आणि त्याच्या हाडांच्या रचनेची तुलना अन्य प्रजातींशी करण्यात आली. रॅकूनची कवटी आणि थूथन या जीवाशी मिळतीजुळती आहे. परंतु आतापर्यंत दातांची पुष्टी होऊ शकलेली नाही. हा जीव बहुधा इमारतीच्या एअर डक्टद्वारे आत शिरला असावा आणि तेथेच अडकून ममी झाला असावा असे कार्टालेसचे मानणे आहे.