अजब रेस्टॉरंट, वेटरच्याजागी ‘हिरो’
फँटेसी वर्ल्ड पाहून व्हाल अचंबित
तुम्ही आतापर्यंत अनेक रेस्टॉरंट्स पाहिली असतील, जी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात. काही अनोख्या थीमची असतात, तर काही ठिकाणी वेगळे खाद्यपदार्थ पुरविले जातात. परंतु एका रेस्टॉरंटने लोकांची मने जिंकण्यासाठी अवलंबिलेली कल्पना कळल्यावर तुम्ही अचंबित व्हाल.
चीनमधील हे रेस्टॉरंट चर्चेत असून तेथे खाणे केवळ स्वादाने नव्हे तर मार्शल आर्ट्सच्या शैलीत सादर केले जाते. येथे वेटर नव्हे तर मार्शल आर्ट्स हीरो लोकांची सेवा करतात. या अनोख्या रेस्टॉरंटचे नाव श्यांगयांग कोर्टयार्ड असून ते चीनच्या हुबेई प्रांतातील श्यांगयांग शहरात आहे. हे रेस्टॉरंट सप्टेंबर महिन्यात सुरू झाले होते आणि काही आठवड्यांमध्येच सोशल मीडियावर व्हायरल सेंसेशन ठरले आहे. याचे वैशिष्ट्या म्हणजे येथे काम करणारे कर्मचारी सामान्य वेटरप्रमाणे नव्हे तर प्रसिद्ध मार्शल आर्ट्स नॉवेल ‘द लिजेंड ऑफ द कॉन्डॉर हीरोज’च्या व्यक्तिरेखांमध्ये असतात.
100 वर्षे जुन्या चीनसारखे वातावरण
रेस्टॉरंटला जुन्या चिनी उद्यानांची आठवण होईल अशाप्रकारे डिझाइन करण्यात आले आहे. आत शिरताच तुम्हाला 100 वर्षे जुन्या चीनमध्ये पोहोचल्याचे वाटेल. भिंतींवर जुने आर्टिफॅक्ट, पारंपरिक सजावट आणि मंद पारंपरिक संगीतच्या धुनमुळे पूर्ण वातावरण जादुई ठरते. येथे दररोज संध्याकाळी 7 वाजता स्टेजवर लाइव्ह मार्शल आर्ट्स परफॉर्मन्सही होतो, ज्यात स्टाफचे सदस्य तलवारबाजी आणि अॅक्शनसीन दाखवितात.
द लिजेंड ऑफ द कॉन्डॉर हीरोज
रेस्टॉरंटचे सर्वात खास वैशिष्ट्या म्हणजे येथील वेटर प्रसिद्ध मार्शल आर्ट्स नॉव्हेलच्या प्रसिद्ध पात्रांची भूमिका साकारतात. एक कर्मचारी हांग रोंगची व्यक्तिरेखा साकारत ग्राहकांना खाद्यपदार्थ सर्व्ह करतो. दुसरा कर्मचारी मेई चाओफेंग स्वत:च्या ‘नाइन यिन स्केलेटन क्लॉ’ नावाच्या धोकादायक मार्शल आर्ट तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. तिसरा कर्मचारी के झेनएची भूमिका साकारून डोळे बंद करत स्वयंपाक करतो. कारण कादंबरीत ही व्यक्तिरेखा अंध असल्याचे नमूद आहे. या सर्व व्यक्तिरेखा साकारण्यासाठी कर्मचाऱ्यांना एक प्रोफेशनल परफॉर्मिंग ट्रुपने प्रशिक्षण देत ग्राहकांना खऱ्या ‘वूशिया वर्ल्ड’चा अनुभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सोशल मीडियावर धमाल
या अनोख्या रेस्टॉरंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल लहो आहेत. अनेक लोक याला क्रिएटिव्ह आयडिया ठरवत आहेत. तर अनेकांनी या रेस्टॉरंटची क्रिएटिव्हिटी आणि संस्कृतीशी निगडित थीमचे कौतुक केले आहे. तर काही लोकांनी खाद्यपदार्थाची गुणवत्ता तसेच हायजीनवर प्रश्न उपस्थित केले आहेत.