अजब बेडूक,शरीर विकासाची उलटी गंगा
वय वाढण्यासोबत आकार होत जातो छोटा
जगात असे अनेक जीव आढळतात जे अत्यंत विचित्र असतात, अशाच जीवांपैकी एक आहे पॅराडॉक्सिकल फ्रॉग. जगात बहुतांश जीव प्रारंभी आकाराने छोटे असतात आणि वय वाढण्यासोबत आकार वाढत जात असतो. परंतु या बेडकासोबत असे घडत नाही. याच्या शरीरात तर विकासाची उलटी गंगाच वाहते. हा जीव प्रारंभी एक मोठा टॅडपोल असतो, परंतु वय वाढू लागताच एका छोट्या बेडकात रुपांतरित होतो. याचमुळे याला स्त्रिंकिंग फ्रॉग म्हणूनही ओळखले जाते. पॅराडॉक्सिकल फ्रॉग मोठा अजब जीव आहे. याचे शास्त्राrय नाव स्यूडिस पॅराडॉक्सा आहे. हा बेडुक किटक फस्त करतो आणि तो उत्तर-दक्षिण अमेरिका आणि त्रिनिदाद येथे आढळून येत असतो. बेडकाची ही प्रजाती अत्यंत असामान्य आहे, कारण जसजसे याचे वय वाढते, तसतसे हे आकारात छोटे जात होतात. प्रौढ अवस्थेच्या तुलनेत लार्वा अवस्थेत ते विशेष स्वरुपात मोठे असतात. प्रारंभिक टप्प्यात याचा आकार प्रौढ होण्याच्या आकाराच्या तुलनेत 3-4 पट मोठा असतो. लार्वा अवस्थेत याचा आकार 9 इंचापर्यंत असतो, परंतु प्रौढ होताच याची लांबी 3 इंचापर्यंत कमी होते. युवा बेडकांच्या स्वरुपात पॅराडॉक्सिकल फ्रॉग रोपांना खात असतात. ते मोठे होताच सरोवर किंवा नद्यांच्या तळावर किटकांची शिकार करणे शिकतात. टॅडपॉपची ग्रोथरेट अन्य प्रजातींच्या समान आहे, परंतु पॅराडॉक्सिकल फ्रॉग वाढत आणि विकसित होत राहतात असे 2009मध्ये द हर्पेटोलॉजिकल जर्नलमध्ये प्रकाशित अध्ययनात म्हटले गेले होते. कायापालटादरम्यान हे टॅडपोल आंकुचित पाऊन बेडुक होत असतात.