कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विचित्र महामारी.. अद्याप रहस्य कायम

06:22 AM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

म्यांव-म्यांव करणाऱ्या नन्सपासून रस्त्यांवर नृत्य करणे आणि सामूहिक स्वरुपात हसण्याच्या काही अशा घटना आहेत, ज्याला विचित्र महामारी मानले गेले आहे. मोठ्या संख्येत अचानक लोकांचे असे असामान्य वर्तन करण्याच्या घटनांचे कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि याचे रहस्य कायम आहे.

Advertisement

हीथ्रो विमानतळाच्या टर्मिनल 4 वर काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. यात अनेक लोक एकाठिकाणी अचानक जमा होऊ लागले आणि त्यांना जळजळ जाणवू लागली. नंतर एका इसमाला सीएस गॅसच्या कॅन्स्टरसोबत अटक करण्यात आली आणि विमानतळावर सामूहिक उन्मादासाठी त्यालाच जबाबदार ठरविण्यात आले आहे. या घटनेनंतर लोकांच्या असामान्य वर्तनाशी निगडित अशाप्रकारच्या यापूर्वी घडलेल्या घटनांची चर्चा होत आहे. या घटनांना महामारीची संज्ञा देण्यात आली आहे आणि याचे रहस्य अद्याप कायम आहे. अशास्थितीत इतिहासातील काही अशाच अजब महामारींबद्दल जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.

Advertisement

बूगी मॅन : जुलै 1518 मध्ये फ्राउ ट्रोफिया नावाच्या एका महिलेने फ्रान्सच्या स्ट्रासबर्ग शहरातील रस्त्यावर काही आकृत्या काढत नाचण्यास सुरवात केली. काही काळातच अन्य लोकांची साथ तिला मिळाली आणि ते नाचू लागले. जवळपास 400 लोकांनी अशा प्रकारे घराबाहेर पडत तिच्यासोबत नाचणे सुरू केले. अनेक आठवड्यांपर्यंत ते असेच नाचत राहिले. यातील काही तर थकव्यामुळे मरून गेले, मग अचानक सर्व थांबले, या घटनेमागील सिद्धांतांमध्ये दुष्काळानंतर निर्माण झालेल्या मोठ्या तणावाला जबाबदार ठरविण्यात आले. या महामारीला बूगी मॅन नाव देण्यात आले.

म्यांव-म्यांव आजार : मध्ययुगात नन्सच्या समुहांदरम्यान सामूहिक उन्मादाच्या घटनेची एक साखळी घडली. जर्मनीत एका ननने स्वत:च्या सहकारी नन्सचा चावा घेण्यास सुरुवात केली. मग अन्य नन्सदेखील त्यात सामील झाल्या आणि अशाप्रकारची कृत्यं करू लागल्या. फ्रान्समध्ये एका ननने म्यांव-म्यांव करण्यास सुरुवात केली आणि काही वेळाच कॉन्व्हेंटमध्ये सर्व नन्स आश्चर्यकारकपणे मांजरांची नक्कल करू लागल्या. या असामान्य वर्तनामागील कारण कोणते होते, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

 

नो जोक महामारी : 30 जानेवारी 1962 रोजी टांझानियाच्या काशाशा गावातील एका शाळेत तीन मुली जोरजोरात हसू लागल्या. हसण्याचा हा आजार पूर्ण इमारतीत फैलावला आणि सर्व विद्यार्थिनी जोरजोरात हसू लागल्या. यानंतर मुलींचे आईवडिलही यात सामील झाले आणि मग अन्य गावांमध्येही हा हसण्याचा आजार फैलावला. लोक अनेक दिवसांपर्यंत हसत राहिले होते. पुढील काही महिन्यांमध्ये सरासरी 1 हजार लोक यामुळे प्रभावित झाले आणि प्रत्येक जण एक आठवड्यापर्यंत हसत राहिले होते. याचे कारण कधीच समजू शकले नाही.

बेशुद्धीचा आजार : ऑक्टोबर 1965 मध्ये लंकाशायरच्या ब्लॅकबर्कमधील एका गर्ल्सस्कूलमध्ये विद्यार्थिनी अनेक दिवसांपर्यंत बेशुद्ध पडू लागल्या. यामुळे 150 विद्यार्थिनी प्रभावित झाल्या. शाळेतील सर्व वर्गांमध्ये या आजाराची नवी प्रकरणे समोर येत होती. काही लोकांनी याकरता पोलियो महामारीला जबाबदार ठरविले, तर काहीजणांनी अन्नबाधा किंवा गॅसगळती कारणीभूत असल्याचा दावा केला, परंतु नंतर एका अहवालात अधिक जोरात श्वास घेतल्याने मुली बेशुद्ध पडल्याचा दावा करण्यात आला.

कारण समोर येत नाही

अचानकपणे लोकांमध्ये सामूहिक असामान्य वर्तनाच्या वृत्तीची अनेक प्रकरणे ठिकठिकाणी दिसून आली आहेत, परंतु लोक असे का करतात, याचे स्पष्ट उत्तर आजवर मिळालेले नाही.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article