हमार समुदायाची विचित्र प्रथा
स्वत: मार खाण्यासाठी येते मेहुणी
इथियोपियात हमार हा आदिवासी समुदाय ओमो खोऱ्यात राहतो. हा समुदाय स्वत:च्या अनोख्या परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. काही परंतरा इतक्या विचित्र आहेत की, बाहेरील लोक थक्क होतात. परंतु या परंपरा शतकांपेक्षा जुन्या असून त्यांच्यासाठी गर्वाचे प्रतीक आहेत. ओमो खोऱ्याचे वॉरियर लोक म्हणजेच हमार समुदायाच्या लोकांची संख्या जवळपास 50 हजार आहे. हे मुख्यत्वे पशुपालक असून गायींना धन आणि समृद्धीचे प्रतीक मानतात. त्यांच्या संस्कृतीत रंगबिरंगी शरीर चित्रकला, दागिने आणि संगीत-नृत्याचे खास महत्त्व आहे. विवाहाचे विधी 3-4 दिवस चालतात.
विवाहादरम्यान बुल जम्पिंग सेरेमनी पार पाडला जातो. यात वराला 10 बैलांवरून न पडता उडी घ्यावी लागते. यात तो यशस्वी ठरला तरच विवाहास पात्र ठरतो. वराला विवाहावेळी मेहुणींना मारबडव करावी लागते. वर यात मेहुणींना तो भरपूर बडवतो आणि त्या तक्रारही करत नाहीत. महिला स्वत: समोर येतात आणि वराला बडविण्याचे आवाहन करतात. समुदायानुसार या मारहाणीच्या खुणा महिलांसाठी गर्वाचा बॅज असतात. जितक्या अधिक खुणा तितका सन्मान. या वेदना सहन करण्याची शक्ती दाखवितात.