महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

येथे आयोजित होते विचित्र स्पर्धा

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाण्यात शोधावा लागतो अजगर

Advertisement

सापांचे जग अत्यंत अजब असते, जेथे अनेक लोक सापांना घाबरतात, तर काही ठिकाणी सापांना पवित्रही मानले जाते आणि त्यांना मारण्यास बंदी असते. परंतु जगात एका ठिकाणी लोकांदरम्यान एक खास प्रकारची स्पर्धा होते, तेथे पाण्याने भरलेल्या भागांमध्ये सापांचे मोठे प्रमाण असते. परंतु स्पर्धा केवळ अजगराला शोधण्याची असते आणि त्यांना ठार करण्याची असते. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये ही स्पर्धा दरवर्षी आयोजित होते. फ्लोरिडा स्वत:चे विचित्र नागरिक आणि असाधारण विचित्र गोष्टींसाठी ओळखले जाते. सापांनी भरलेल्या पाण्यातून अजगर बाहेर काढण्याच्या या विचित्र स्पर्धेला सनशाइन स्टेटच्या सर्वात अजब परंपरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. ऑगस्ट महिन्यात फ्लोरिडा आणि त्याच्या बाहेरील स्पर्धक वार्षिक पायथन चॅलेंजमध्ये भाग घेतात. यात लोक धोकादायक साप पकडणे आणि त्यांना मारण्यासाठी प्रतिस्पर्धा करतात.

Advertisement

शेकडो स्पर्धक स्वत:च्या मर्जीनुसार अजगरांची शिकार करतात, फ्लोरिडा मासे आणि वन्यजीव संरक्षण आयोगानुसार बर्मीज अजगर सनशाइन स्टेटमध्ये एक आक्रमक प्रजाती असून ती 19 फूटापर्यंत लांब असू शकते. ते विशाल एवरग्लेड्स वेटलँडसमध्ये आणि त्याच्या आसपास आढळून येतात आणि देशी वेटलँड्ससाठी धोका निर्माण करतात. बर्मीज अजगर स्थानिक वन्यजीवांसह पर्यावरणासाठी धोका निर्माण करतात. हे मोठ्या संख्येत प्रजनन करू शकतात आणि अंड्यापासून छोटी हरणं आणि मगरींसारखे अनेक प्राणी फस्त करत असतात. स्पर्धेत पहिला पुरस्कार यंदा 8 लाख 40 हजार रुपयांचा होता. सर्वाधिक अजगर हटविणाऱ्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार दोन लाख 10 हजार 84 रुपयांचा होता. स्पर्धकांना स्पर्धेत खास प्रकारच्या नियमांचे पालन करावे लागते. जर अमानवीय पद्धतीने अजगराला ठार केले किंवा एखाद्या देशी सापाला हटविले तर त्याला अपात्र घोषित करण्यात येते. अजगराला मारण्याची एक मानवीय पद्धत ‘पिथिंग’ असून त्यात अजगराला त्रास न पोहोचविता त्याचा मेंदू नष्ट केला जात असतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article