उत्तर कोरियात विचित्र स्पर्धा
उत्तर कोरिया हा देश बहुतांश देशांपासून तुटलेला आहे. येथे हुकुमशहा किम जोंग उन यांचे शासन असून त्याचा अजब आदेश आणि निर्णय चर्चेत असतात. आता तेथील एक स्पर्धा चर्चेत आहे. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये श्वानाचे मांस शिजविण्याची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात देशभरातील जवळपास 200 शेफ सामील झाले. उत्तर कोरियात श्वानाला ‘स्वीट मीट’ म्हटले जाते. याचमुळे या स्पर्धेचे नाव स्वीट मीट कॉम्पिटिशन ठेवण्यात आले होते. यात भाग घेणारे सर्व शेफ या वादग्रस्त व्यंजन तयार करण्यात स्वत:चे कौशल्य दाखविण्यासाठी एकत्र आले होते.
हा कार्यक्रम किम जोंग उन यांच्या शासनाकडून आयोजित करण्यात आला होता. राजधानीच्या रयोम्योंग स्ट्रीट येथील फूड फेस्टिव्हल हाउसमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सीकडून जारी फुटेजमध्ये शेफला श्वानाच्या मांसाने निर्मित खाद्यपदार्थांना सादर करताना दाखविण्यात आले. यात देशाचे पारंपरिक श्वानाच्या मांसाचे सूप किंवा टँगोगी देखील सामील हेते.
चालू वर्षाच्या स्पर्धेत मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने अधिक उमेदवार सामील झाल्याचा दावा वृत्तसंस्थेकडून करण्यात आला. स्वीट मीटच्या सूपला उन्हाळ्यात ऊर्जेचा पारंपरिक स्रोत ठरविण्यात आले आणि या कुक-ऑफचा उद्देश पाककलेच्या मापदंडांना उंच करणे आणि मांस शिजविण्याची माहिती पुरविणे होते असा दावा करण्यात आला.
उत्तर अमेरिकेतही प्रचलित स्वीट मीट
उत्तर अमेरिकेत दीर्घकाळापासून खाण्यात येणाऱ्या श्वानाच्या मांसाला सरकारकडून देशाच्या मर्यादित आहाराच्या स्वरुपात अधिकृतपणे प्रोत्साहित केले जात अहे. तर उत्तर कोरियाने 2022 मध्ये स्वीट मीटच्या सूपला स्थानिक सांस्कृतिक वारशाच्या स्वरुपात नोंदणीकृत केले आहे.
शेजारी बंदी
हे पाऊल दक्षिण कोरियाच्या उलट आहे. तेथे मागील वर्षी एका कायद्याच्या अंतर्गत श्वानाच्या मांसाचे उत्पादन, वितरण आणि विक्रीला अवैध ठरविण्यात आले आहे. तर उत्तर कोरियात खाद्यान्नाची कमतरता दीर्घकाळापासून आहे. या स्पर्धेद्वारे उत्तर कोरिया स्वत:च्या संस्कृतीवर प्रकाश टाकण्याऐवजी जनतेचे लक्ष अन्नधान्याच्या कमतरतेपासून हटवू पाहत होता.