अजब योगायोग 26 वर्षांपूर्वी आईने लिहिले होते पत्र
मुलीला सरोवरात मिळाले बाटलीबंद पत्र
अमेरिकेच्या एका विद्यार्थिनीसोबत अजब योगायोग घडला आहे. या मुलीला स्वत:च्या शालेय सहलीवर एक अशी गोष्ट मिळाली, जी तिच्याशी संबंधित होती. चौथीत शिकणारी विद्यार्थिनी शाळेच्या फील्ड ट्रिप अंतर्गत ग्रेट लेक येथे गेली होती. तेथे ती स्वत:च्या मैत्रिणींसोबत फिरत असताना तिला सरोवराच्या काठावर एक बाटली मिळाली. या बाटलीत एक पत्र होते. मुलीने कुतुहूलापोटी ती बाटली उचलली आणि त्यातील पत्र बाहेर काढले, विद्यार्थिनीने पत्र वाचल्यावर ती चकितच झाली. कारण हे पत्र तिच्या आईनेच लिहिले होते. 1998 मध्ये तिच्या आईने पत्र लिहून ते ग्रेट लेकमध्ये फेकले होते.
सेंट जॉन द बॅपटिस्ट कॅथोलिक एलिमेंट्री स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकणारी विद्यार्थिनी स्कारलेट वॅन आइक फील्ड ट्रिपदरम्यान ग्रेट लेक्सच्या आसपास फिरत होती. तेव्हा तिला अन्य एका मुलाने रहस्यमय दिसणारी बाटली दाखविली. एका शिक्षिपेन बाटलीत ठेवलेले पत्र वाचण्यास सुरुवात केली, तेव्हा स्कारलेट वॅन आइक ही हे पत्र तिची आई मॅकेन्जी वॅन आइकने लिहिल्याचे कळल्यावर दंग झाली.
हे पत्र मॅकेन्जी मॉरिस लिहित आहे आणि मी सेंट जॉन द बॅपटिस्ट स्कूलमध्ये शिकते. मी सेंट पियरेच्या इयत्ता चौथीत आहे. माझे पत्र ग्रेट लेक्समध्ये पाण्याविषयी आहे. आम्ही ‘पॅडल-टू-द-सी’ नावाचे पुस्तक वाचले. हे एक अत्यंत चांगले पुस्तक होते असे या पत्रात नमूद होते.
आईने शालेय काळात लिहिलेले पत्र
बाटलीत लिहिलेला संदेश 1998 चा आहे. तेव्हा मॅकेन्जी वॅन आइक या बेले रिवर, ओंटारियोमध्ये सेंट जॉन द बॅपटिस्ट कॅथोलिक एलिमेंट्री स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत होत्या. त्यांची मुलगी आता याच वर्गात आहे. त्यावेळी मॅकेन्जी आणि तिच्यासोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रेट लेक्सविषयी पत्रात लिहिण्याचे काम सोपविण्यात आले होते. मग ही पत्रं बाटल्यांमध्ये भरून पाण्यात फेकण्यात आली होती.