For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अजब प्राणी : जिराफ-झेब्रा-घोड्याचे मिश्रण

06:08 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
अजब प्राणी   जिराफ झेब्रा घोड्याचे मिश्रण

जिभेची लांबी करणार चकित

Advertisement

ओकापी हा जगातील सर्वात अजब प्राणी असून त्याची वैशिष्ट्यो तज्ञांनाही अचंबित करून सोडणारी आहेत. हा मोठा रहस्यमय प्राणी आहे, कारण यात जिराफ, झेब्रा आणि घोड्याचे विचित्र मिश्रण दिसून येते. याची जीभ तर अत्यंत अनोखी असते, त्याची लांबी ऐकून तुम्ही चकितच व्हाल. आता या प्राण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत ओकापी प्राणी पाहता येतो. हा व्हिडिओ केवळ 28 सेकंदांचा असून तो पाहून तुमच्यामध्ये या प्राण्यासंबंधी आश्चर्य आणि कुतुहूलाची भावना निर्माण होईल. ओकापी हा एक लाजाळू आणि एकट्याने राहणे पसंत करणारा प्राणी आहे. याचे शास्त्राrय नाव ओकापिया जॉन्स्टोनी आहे. हा प्राणी कांगो या देशातील घनदाट जंगलांमध्ये आढळून येतो. ओकापीमध्ये शीर जिराफाचे,  शरीरावर झेब्य्रासारखे पांढरे पट्टे, घोड्याचे शरीर आणि काळ्या रंगाची जीभ असते, ही जीभ त्याचे डोळे आणि कानांना साफ करण्यासाठी सक्षम आहे. याची जीभ 18 इंचापर्यंत लांब असू शकते.

Advertisement

ओकापीची लांब जीभ त्याच्याकरता अत्यंत सहाय्यभूत ठरते, याच्या मदतीने तो झाडांच्या फांद्यांवरून पाने तोडून खाऊ शकतो. तसेच हा प्राणी फळे, जळालेली लाकडं आणि बॅट गुआनो देखील फस्त करत असतो ओकापी हा जिराफांशी साधर्म्य असणारा प्राणी आहे, परंतु ओकाफीची मान आणि पाय आकाराने छोटे असतात.

Advertisement

लुप्त होण्याच्या मार्गावर

नर ओकापी सर्वसाधारणपणे सुमारे 2.5 मीटर लांब असतात. याचे वजन सर्वसाधारणपणे 200-300 किलोग्रॅम इतके असते. हा प्राणी 20-30 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो. ओकापीचे अस्तित्व सध्या संकटात सापडले आहे. संकटग्रस्त प्रजातींच्या आययुसीएन रेड लिस्टनुसार ओकापी हा लुप्तप्राय प्रजातीतील प्राणी आहे. 4500 पेक्षा कमी ओकापी जंगलात राहत आहेत. 1995-2007 दरम्यान ओकापींच्या संख्येत 40 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. मोठ्याघ् प्रमाणावर जंगलतोड, अवैध शिकार आणि मांसाच्या व्यापारामुळे या प्राण्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच बिबटे या प्राण्याची शिकार करत असतात.

Advertisement
Tags :
×

.