महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वादळी पावसाचा राज्याला दणका

02:43 PM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने मोठी हानी,आजही मुसळधार, ऑरेंज अॅलर्ट जारी

Advertisement

पणजी : पावसाचे प्रमाण थोडे कमी असले तरी तो थांबून थांबून जोरदार वादळानिशी पडत असल्याने राज्यात अनेक झाडे पडली व त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. गोव्यात पावसाबरोबर गेले 4 दिवस वादळही थैमान घालीत आहे. गुरुवारी मध्यरात्री 11.30 च्या दरम्यान जोरदार वादळ झाले व त्यात अनेक घरांची कौले उडाली. अनेक इमारतींवरील पत्रेही उडाले. राज्याच्या विविध भागात झाडे उन्मळून पडली. त्यात अनेक घरांची हानी झाली. पहाटे 5 वाजता पुन्हा एकदा जोरदार वादळ झाले. दुपारी पुन्हा एकदा वादळ झाले व सायंकाळी 4 वा. जोरदार वादळ झाले. जणू काही चक्रिवादळाप्रमाणेच ते होते आणि त्याची तिव्रता ही देखील जबरदस्त होती. वाढत्या वाऱ्यामुळे व जोरदार पावसामुळे घरातून बाहेर पडायला देखील अनेक मंडळी घाबरत होती, अशी स्थिती निर्माण झाली.

Advertisement

अरबी समुद्रातील बदलत्या वातावरणाचा परिणाम 

हवामान खात्याशी संपर्क साधला असता हे चक्रीवादळ नाही. परंतु अरबी समुद्रातील बदलत्या वातावरणाच्या परिणामाचा इशारा त्यांनी दिला. हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा वेग ताशी 60 कि. मी. पर्यंत जाईल, असा इशारा दिला होता. प्रत्यक्षात वादळी वाऱ्याचा वेग त्याहीपेक्षा पुढे गेला होता.

 जवळपास सर्वच भागात झाडांची पडझड

संपूर्ण गोव्यात वादळीवाऱ्याने अक्षरश: थैमान घातलेले आहे. पावसाचे प्रमाण कमी होतेय अशी स्थिती निर्माण होत असतानाच वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला व त्याचबरोबर अधून मधून जोरदार पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले. या वादळी वाऱ्यामुळे गोव्यातील जवळपास सर्वच भागात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झालेली आहे. अग्निशामक दलाचे फोन दिवसरात्र घणघणत आहेत. प्रचंड प्रमाणात झाडांची पडझड झाल्याने कित्येक ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्याची पाळी आली.

आतापर्यंत 112 इंच नोंद

दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये 1.50 इंच पावसाची नोंद शुक्रवारी झाली. यामुळे यंदाच्या मौसमात आतापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद 112 इंच झाली आहे. वाळपईत सर्वांधिक 2.5 इंच पावसाची नोंद झाली. वाळपईत आतापर्यंत 1136 एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा 1 इंच, पेडणे पाऊण इंच, फोंडा पाऊण इंच, पणजी 1.5 इंच, जुने गोवे 2 इंच, सांखळी 1.50 इंच, काणकोण अर्धा इंच, दाबोळी 1 से. मी., मडगाव 1.50 इंच, मुरगाव 2.5 इंच, केपे 2.5 इंच व सांगे 2.5 इंच पावसाची नोंद झाली. आगामी 24 तासांमध्ये गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे व ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article