दोन दिवसांच्या तेजीला पूर्णविराम!
सेन्सेक्स जवळपास 398 तर निफ्टी 122 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात बुधवारी मागील दोन दिवसांच्या तेजीला पूर्णविराम मिळाल्याचे दिसून आले. यामध्ये आशियातील नकारात्मक वातावरणाचा प्रभाव झाल्याने बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. मुख्य कंपन्यांपैकी बुधवारच्या सत्रात टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 398.13 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.49 टक्क्यांसोबत 81,523.16 वर बंद झाला. ट्रेडिंगच्या दरम्यान सेन्सेक्स 498.15 अंकांनी प्रभावीत राहिला होता. तसेच दुसऱ्या बाजूला निफ्टी दिवसअखेर 122.65 अंकांच्या घसरणीसह 0.49 टक्क्यांसह 24,918.45 वर बंद झाला.
मुख्य कंपन्यांमध्ये बुधवारी सेन्सेक्समधील टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक म्हणजे 6 टक्क्यांनी घसरणीत राहिले आहेत. यासह एनटीपीसी, अदानी पोर्टस, लार्सन अॅण्ड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इंडसइंड बँक आणि टायटन यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग नफा कमाईसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारांची स्थिती
आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले आहेत. युरोपमधील मुख्य बाजारांमध्ये दुपारनंतर तेजीचा कल राहिला होता. अमेरिकन बाजारात मंगळवारी तेजी राहिली होती.
शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी 2,208.23 कोटी रुपये मूल्य असणाऱ्या समभागांची खरेदी करण्यात आली. जागतिक बाजारात कच्चे तेल 1.49 टक्क्यांनी वधारुन 70.22 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.