For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

तुमचा भाचा नरेंद्र मोदींना रोखून दाखवणार...तेजस्वी यादव यांची नितीश कुमारांवर टिका

06:15 PM Feb 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
तुमचा भाचा नरेंद्र मोदींना रोखून दाखवणार   तेजस्वी यादव यांची नितीश कुमारांवर टिका
Tejaswi Yadav comments Nitish Kumar

बिहार विधानसभेत सोमवारी फ्लोअर टेस्टपूर्वी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टिका केली. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी हाती घेतलेला झेंडा आता मी हाती घेतला असून तो मी पुर्ण करेन अशी घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी जेडीयुचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी स्वत: स्थापन केलेली इंडिया आघाडी सोडून राज्यातील आरजेडीशी काडीमोड घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला.

Advertisement

बिहार विधानसभेमध्ये आज नितीशकुमार यांच्या अविश्वास ठरावावर मतदान झाले. या हा अविश्वास ठराव नितीशकुमारांनी जिंकला असून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला आता कोणताही धोका नाही. तत्पुर्वी सभागृहाला संबोधित करहताना यशस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यादव यांच्यावर जोरदार टिका केली. ते म्हणाले, "मला जेडीयू आमदारांचे वाईट वाटत आहे. कारण त्या लोकांना थेट जनतेमध्ये जाऊन नितीश कुमार यांच्या कृतीचं उत्तर द्यावं लागत आहे. नितीश कुमार यांनी एका टर्ममध्ये 3 वेळा शपथ का घेतली, याच उत्तर काय देणार? या अगोदर तुम्ही भाजपवर टीका करत होता आणि आता तुम्ही प्रशंसा करताय." असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, "आम्ही नितीश कुमार यांना आमच्या कुटुंबातील सदस्य समजतो. आम्ही समाजवादी कुटुंबातील आहोत...तुम्ही मोदींना रोखण्यासाठी जो संकल्प केला होता तो संकल्प मी पुर्ण करणार. तुम्ही उभारलेला झेंडा आता मी पुढे नेणार. आणि तोच झेंडा घेऊन मी मोदींना बिहारमध्ये रोखणार" असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.