महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरटीओकडून होणारी सतावणूक थांबवा

12:21 PM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वागातोर टॅक्सी चालकांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे : पत्रकार परिषदेतून मांडल्या चालकांच्या समस्या

Advertisement

म्हापसा : आरटीओ खात्यातील फ्लाईंग स्कॉडचे अधिकारी भालचंद्र वायंगणकर यांनी सध्या वागातोर किनारी भागात येऊन विनाकारण दंड ठोठावून सतावणूक चालविली आहे. हा प्रकार गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. या सतावणुकीला वागातोर भागातील नागरिक तसेच स्थानिक टॅक्सीचालक व हॉटेलमालकांनी एकत्र येऊन काल सोमवारी सायंकाळी निदर्शने केली. आरटीओ अधिकाऱ्याने पुन्हा सतावणूक केल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा वागातोर येथे पत्रकार परिषदेत दिला. गेल्या दोन दिवसापासून आरटीओ अधिकारी वागातोर येथे येऊन वाहनचालकांना बॅच नसल्याचे सांगून 10 हजार दंड देऊ लागले आहेत. सरकारने यावर लक्ष देणे गरजेचे आहे. गोवा माईल्सच्या 95 टक्के जणांकडे बॅच नाही. मात्र त्यांना दंड देण्याचे धाडस कुणीही करीत नाही. दहा हजार रुपयांचा दंड भरून आम्ही खाणार काय? असा सवाल आसगाव पंचायतीचे माजी सरपंच जालींदर गावकर यांनी केला.

Advertisement

 स्थानिकाना सुविधा का नाही?

कांदोळी ते हरमल स्थानिकांच्याच गाड्या आहेत. मात्र त्यांना सुविधा दिल्या जात नाही. गोवा माईल्सवाल्यांना सर्व सोयीसुविधा दिल्या जातात, मात्र स्थानिकांना या सुविधा का दिल्या जात नाही? स्थानिक टॅक्सी चालकांची सतावणूक आरटीओने त्वरित बंद करावी, असे हणजुण पंचायतीचे पंचसदस्य सुरेंद्र गेवेकर म्हणाले.

पैसे न दिल्यास 10 हजार दंड 

निज गोंयकार यांचा टॅक्सी हा एकमेव व्यवसाय राहिला आहे. या व्यवसायासाठी आम्ही सदैव भांडत असतो. फ्लाईंग स्कॉडचे आरटीओ भालचंद्र वायंगणकर आमची सतावणूक करीत आहेत. आम्ही याबाबत दक्षता खात्याकडेही तक्रार करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी योगेश गोवेकर यांनी केली आहे. आमची एक गाडी शिवोलीतून आसगाव येथे जात असताना आरटीओ भाचलंद्र वायंगणकर यांनी अडवली व बॅचची मागणी केली असता त्यांनी नाही म्हणून सांगितल्यावर त्या चालकाकडे 5 हजारांची मागणी केली. त्यांच्याकडे नसल्याने 10 हजाराचा त्यांना दंड दिला. ही पूर्णत: सतावणूक आहे, असे गोवेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article