म्हैसाळ पाण्यासह विविध मागण्यासाठी मुचंडी येथे रास्ता रोको
वळसंग प्रतिनिधी
जत तालुक्यातील गुहागर विजापूर राज्य मार्गावर मुचंडी येथे शेतकऱ्यांनी म्हैशाळ योजनेचे पाणी व अनेक मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले. म्हैशाळ योजनेचे उपविभागीय अभियंता गणेश खरमाटे यांनी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरीबडची, दरीकुनुर ,सिद्धनाथ, संख तलावात म्हैशाळ योजना व तुबची बबलेश्वर या योजनेतून तलावात पाणी भरून मिळण्यासाठी सहा महिन्यापासून शेतकरी मागणी करीत आहेत . जर हे पाणी सोडल्यास बरीच गावे टँकर मुक्त होणार आहेत .म्हैशाळ योजनेचे पाणी जत तालुक्यातील देवनाळला पोहोचले असून देवनांपासून सिद्धनाथ तलाव संख तलाव सायपन पद्धतीने शासनाचा एकही रुपया न खर्च करता भरून देता येईल . म्हैशाळचे पाणी शेड्याळ या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनचे पाणी पोचले आहे. तरी तेथून दरिकोणुर तलावात पाणी सोडून हे तलाव भरून घेता येईल. आणि यामुळे दहा ते बारा गावांना पाणीटंचाईचा त्रास कमी होईल. सद्यस्थितीमध्ये जनावरांना माणसांना पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल होत आहे याची सोय करण्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली होती. तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या शेतकऱ्यांनी सकाळी नऊ वाजता विजापूर गुहागर या मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनास आमदार विक्रम दादा सावंत उपस्थित राहून मार्गदर्शन केले .त्याचबरोबर तुकाराम बाबा महाराज यांनी सदर आंदोलनास पाठिंबा दिला. आंदोलन करते सकाळी नऊ पासून रास्ता रोको सुरुवात केली दुपारी एक वाजेपर्यंत प्रशासनाचे कोणते ही प्रतिनिधी फिरकले नाहीत. नंतर आंदोलन करते आक्रमक झाल्यानंतर नायब तशिलदार बाळासाहेब सवदे ,तलाठी विलास चव्हाण व म्हैशाळ योजनेचे उप अभियंता गणेश खरमाटे उपस्थित झाले .तर आंदोलन करते आपल्या मागण्यावर ठाम होते आंदोलन करते लेखी आश्वासन मागत होते प्रशासनाच्या अधिकारी लेखी आश्वासन देण्यास टाळाटाळ केली असता किरकोळ आंदोलन करते व प्रशासन यांच्यामध्ये वाद झाले. म्हैशाळ योजनेचे उप अभियंता गणेश खरमाटे यांनी पाणी देण्याचे मान्य केले जर प्रशासनाने पंधरा दिवसात पाण्याची व्यवस्था नाही केली तर परत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते रमेश देवर्षी सह शेतकऱ्यांनी दिला आहे.
या रस्ता रोको मध्ये रमेश देवर्षी ,तम्मा कुलाळ, सागर शिंगारे ,शशिकांत पाटील, अमीन शेख ,राघवेंद्र चौगुले, अशोक बिरादार, शंकर वगैरे,कामाण्णा पाटील,आनंदराव पाटील ,यांच्यासह मुंचडी, दरीबडची, दरिकोणुर ,अमृतवाडी, सिद्धनाथ ,रावळगुंडवाडी ,सोरडी,पाच्छापूर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.