Miraj Crime : मिरज हायस्कूलजवळ हळदी कार्यक्रमात तरुणावर दगडाने मारहाण
मिरज शहरात हळदी कार्यक्रमात हिंसाचार
मिरज : मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना चेष्टा करु नको, असे म्हटल्याच्या कारणातून तरुणाला दगडाने मारहाण करुन जखमी करण्यात आले. तसेच त्याच्या पत्नीस शिवीगाळ करुन दमदाट केली. शहरातील मिरज हायस्कुलजवळ ही घटना घडली. याबाबत अविष्कार संतोष जाधव (वय २४, रा. विद्यानगर, अस्वले कॉलनी, मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
त्यानुसार संशयींत अनिकेत चौधरी, आदित्य चौधरी, गजानन चौधरी, जनार्दन चौधरी या चौघांवर गुन्हा आहे. अविष्कार जाधवने दिलेल्या तक्रारीनुसार, मित्राच्या लग्नानिमित्त हळदीचा कार्यक्रमासाठी जवाहर हायस्कूल येथे गेला होता. संशयीत अनिकेत याने नाचण्यासाठी अविष्कार याचा हात ओढला. अविष्कारने विरोध करुन चेष्टा करु नको, असे सांगितले. याचा राग येऊन संशयीत अनिकेत व अन्य साथीदारांनी अविष्कार याला मारहाण करत पत्नीलाही शिवीगाळ करुन दमदाट केली.