‘तो’ रस्ता दगड टाकून बंद
बेळगाव : शहापूर येथील महात्मा फुले रोडवरील बँक ऑफ इंडियापासून जुन्या धारवाड रोडवरील जागा मूळ मालकाला दिली. यावेळी त्याठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. मात्र बॅरिकेड्स काढून तेथून वाहने नेण्यात येत होती. यामुळे आता त्या रस्त्यावर दगड टाकले आहेत. त्यामुळे पूर्ण रस्ताच बंद झाला आहे. शहापूर येथील त्या जागेचा वाद उच्च न्यायालयात होता. जागा मालकाने महानगरपालिकेविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर महानगरपालिकेने ‘ती’ जागा त्या मूळ मालकाला सर्व्हे करून दिली. या जागेवर रस्ता पूर्ण झाला होता. त्यामुळे वाहने ये-जा करत होती. सर्व्हे करून जागा मूळ मालकाच्या कब्जात दिली. त्यावेळी लोखंडी बॅरिकेड्स उभे करण्यात आले होते. तरी देखील तेथून वाहने ये-जा करीत होती. बुधवारी या रस्त्यावर दगड टाकून हा रस्ताच पूर्ण बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता रस्त्याची समस्या निर्माण झाली आहे. एकूणच महानगरपालिका व स्मार्ट सिटीने केलेला हा रस्ता बंद झाला आहे.