सिद्धार्थनगरात दगडफेक, वाहनांची जाळपोळ
कोल्हापूर :
सामाजिक सलोख्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीत शुक्रवारी दोन गटात तणाव निर्माण झाला. भारत तरुण मंडळाच्या वर्धापन दिनाच्या जल्लोषाचे रूपांतर दोन समाजात तेढ होण्यात झाले. आणि यातून दगडफेक, वाहनांची तोडफोड, जाळपोळ झाली. यात सुमारे १० तरूण जखमी झाले. कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर आणि राजेबागस्वार परिसरातील तणाव अखेर रात्री निवळला.
- चार पोलीस जखमी
दगडफेकीच्या घटनेमध्ये चार पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये 1 पोलीस उपनिरीक्षक, तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी समीर मुल्ला यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिपीआर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
- प्रवासातील हेल्मेट
सिद्धार्थनगर येथील दगडफेकीच्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे बंदोबस्ताचे हेल्मेट नव्हते, असे कर्मचारी दुचाकीवर प्रवासासाठी वापरण्यात येणारे हेल्मेट परिधान करुन बंदोबस्तामध्ये सहभागी झाले होते.

- सर्व फौजफाटा सिद्धार्थनगरात
सिद्धार्थनगर येथील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर शहरातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सिद्धार्थनगर येथे पाचारण करण्यात आले होते. पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, गृह पोलीस उपअधिक्षक तानाजी सावंत, शहर पोलीस उपअधिक्षक प्रिया पाटील, करवीर पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षिरसागर, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस निरीक्षक श्रीराम कनेरकर, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी परिस्थीती नियंत्रणाखली आणण्यासाठी थांबून होते.
- रात्रीच पंचनामा, उशिरापर्यंत गुन्हा दाखल
दरडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमध्ये 10 वाहनांचे नुकसान झाले. तसेच 10 जण जखमी झाले. या घटनेतील नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी नायब तहसिलदार भालचंद्र यादव यांना तात्काळ घटनास्थळी बोलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ते घटनास्थळी थांबून हेते.
- फुटबॉल क्लबचे तीनही फलक पोलिसांनी काढले...
भारत तऊण मंडळ प्रणित राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या वतीने आपल्या वर्धापनदिनाचे तीन मोठे फलक सिद्धार्थनगर चौकात लावले होते. दगडफेकीचा प्रकार घडल्यानंतर तऊणांच्या जमावाने या फलकांवर जोरदार दगडफेक केली. संतप्त भावना व्यक्त करत एक मोठा फलकही फाडला. रात्री अकराच्या सुमारास बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी राजेबागस्वार क्लबचे तिनही फलक काढले. पुन्हा फलक लावू नका, अशा क्लबच्या कार्यकर्त्यांना सुचनाही दिल्या.

- ज्येष्ठांकडून जमावावर नियंत्रण...
दोन गटात मारामारी, दगडफेड फेकीचा प्रकार घडल्याची वार्ता सोशल मीडियावऊन वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी दाखल असलेल्या पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतू संतप्त कार्यकर्ते शांत होत नव्हते. याचवेळी समाजातील जाणकारांनी पुढाकार घेऊन दोन्हीही गटातील संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढली. सुमारे तास समजूत काढली जात होती. त्यानंतरच्या दोन्ही गटातील संतप्त कार्यकर्ते शांत झाले आणि पुढील अनर्थ टळला.

- घटनाक्रम
- सकाळी 11 वाजता सिद्धार्थनगर येथे राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या वतीने पोस्टर लावण्यात आले.
- 11. 30 वाजता कमानीच्या आडवे स्ट्रक्चर उभे करुन रस्ता बंद करण्याचा प्रयत्न
- सिद्धार्थनगर येथील नागरीकांकडून स्टक्चरला आक्षेप
- 12 वाजता नागरीकांची लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला धाव
- 1 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी स्ट्रक्चर उतरुन घेतले
- स्ट्रक्चर उतरवताना निळ्या रंगाचा झेंडाही उतरविण्यात आला
- सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुन्हा फलक उभारण्यास सुरुवात
- 7 वाजेपर्यंत चौकातच पाठोपाठ तीन फलक उभारण्यात आले.
- रात्री 9 वाजण्याच्या सुमारास डॉल्बी लावून वर्धापनदिन साजरा करण्यास सुरुवात, फटाक्यांची आतिषबाजी करत हुल्लडबाजीला सुरुवात
- 9.30 वाजता झेंडा फाडल्याची अफवा पसरली आणि दगफेकीला सुरुवात
- 9. 45 वाजता राजेबागस्वार येथील जमावाकडून सिद्धार्थनगरच्या दिशेने दगडफेक, वाहनांच्या जाळपोळीस सुरुवात
- 9. 55 वाजता पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल
- 10. 10 वाजता पोलीसांच्या समोरच वाहनांची जाळपोळ
- 10. 20 पोलिसांवरच दगडफेक, चार पोलीस जखमी
- 10. 25 पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता घटनास्थळी दाखल
- 10. 35 दोनही बाजूच्या जमावावर नियंत्रण
- 10. 40 पोलीस अधिक्षकांकडून कारवाईचे आश्वासन
- 10. 50 सिद्धार्थनगर मधील जमाव शांत
- 11. 00 वादग्रस्त फलक उतरवून घेण्यात आले
- रात्रीभर पोलीस बंदोबस्ता