कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्टोक्सची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात?

06:51 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

2023 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विद्यमान विजेत्या इंग्लंड संघाची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाल्याने त्यांना प्राथमिक फेरीतूनच बाहेर पडावे लागले. उपांत्य फेरीचे त्यांचे स्वप्न उध्वस्त झाले. इंग्लंड संघातील अष्टपैलू बेन स्टोक्सची क्रिकेट कारकीर्द पुन्हा धोक्यात आली आहे. नजिकच्या काळात स्टोक्सने आपल्या गुडघ्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्टोक्सच्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

स्टोक्सने यापूर्वी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने  हा निर्णय रद्द करून पुन्हा वनडे क्रिकेटमध्ये खेळण्याचे धाडस केले. दरम्यान गुडघा दुखापतीच्या समस्येमुळे स्टोक्स वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व स्टोक्सकडे सोपविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article