तिमाही अहवालानंतर समभाग तेजीत
जानेवारी ते मार्च दरम्यानची कामगिरी
वृत्तसंस्था/ मुंबई
2024-25 च्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर आयटी कंपनी एचसीएल टेकचे समभाग 8 टक्क्यांनी वाढले आहेत. वाढून समभाग 1,597 वर व्यवहार करत आहेत. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने 4,309 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 3995 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. चौथ्या तिमाहीत एकूण उत्पन्न 30,695 कोटी रुपये होते. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.15 टक्के जास्त आहे. कंपनीचा ऑपरेटिंग महसूल 30,246 कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीने एकूण 24,960 कोटी रुपये खर्च केले, ज्यापैकी 1,426 कोटी रुपये कर म्हणून भरले गेले.
कंपनीचा हेतू काय आहे?
एचसीएल टेकला 2025-26 मध्ये त्यांचे सेवा उत्पन्न 2.0 ते 5.0 टक्के वार्षिक दराने वाढण्याची अपेक्षा आहे.
समभागाची कामगिरी
एचसीएल कंपनीचे समभाग बुधवारी 8 टक्के वाढले होते. एचसीएल टेकचे समभाग एका वर्षात 6.45 टक्के वाढले आहेत. गेल्या 5 दिवसांत एचसीएल टेकचे समभाग हे 11.32 टक्के आणि वर्षात 6.45 टक्क्यांनी वाढले आहेत.