For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअरबाजारात सोमवारी मोठी घसरण, निफ्टी 345 अंकांनी नुकसानीत

06:52 AM Jan 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
शेअरबाजारात सोमवारी मोठी घसरण  निफ्टी 345 अंकांनी नुकसानीत
Advertisement

त्सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला : 12 लाख कोटी बुडाले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

सोमवारी भारतीय शेअरबाजारात सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक जवळपास 1.5 टक्के इतके घसरणीसह बंद झाले आहेत. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास 2 हजार अंकांनी घसरला होता. जागतिक बाजारातही दबाव पाहायला मिळाला आहे.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1049 अंकांनी कोसळत किंवा 1.35 टक्के घटत 76,330 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 345 अंकांनी किंवा 1.47 टक्के इतका घसरत 23,085 अंकांवर बंद झाला. नव्या वर्षात पहिल्या आठवड्यात शेअरबाजारात तेजी दिसली होती. पण दुसऱ्या आठवड्यात पुन्हा शेअरबाजारात नकारात्मक वातावरण पाहायला मिळाले आहे. सोमवारच्या मोठ्या घसरणीत गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी स्वाहा झाले आहेत. सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य आता 417.28 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे.

हे समभाग तेजीत

निफ्टी 50 मधील समभागांचा विचार करता खासगी बँक अॅक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. बँकेचे समभाग 0.83 टक्के वाढत 1049 रुपयांवर बंद झाले. सतेच आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएस 0.60 टक्के वाढत 4291 रुपये, इंडसइंड बँकेचे समभाग 0.44 टक्के वाढत 941 च्या स्तरावर बंद झाले होते. तसेच एचयुएलचे समभाग 0.37 टक्के वाढीसह 2451 रुपयांवर बंद झाले होते.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 6.29 टक्के घटत 2225 रुपयांवर राहिले होते. ट्रेंटचे समभाग 5.47 टक्के नुकसानीसह 6224 रुपये, बीपीसीएलचे समभाग 4.45 टक्के घसरत 265 च्या स्तरावर बंद झाले. बीइएलचे समभाग 4.21 टक्के आणि  अदानी पोर्टसचे समभाग 4.10 टक्के नुकसानीत होते.

सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरले

सोमवारी दिवसभराच्या व्यवहारात सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीत बंद झाले. निफ्टी एफएमसीजी 1.22 टक्के, आयटी 1.37 टक्के, बँक निफ्टी 1.42 टक्के, ऑटो 2.76 टक्के आणि मेटल निर्देशांकही 3.77 टक्के इतका घसरणीत होता.

सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 26 घसरणीसह तर निफ्टीतील 50 पैकी 46  समभाग घसरणीत होते. जागतिक बाजारात निक्केई बंद होता. कोस्पी 1.04 टक्के घसरणीत होता. चीनचा शांघाई कम्पोझीटही घसरणीत होता. 10 जानेवारीला अमेरिकेचा डोव्ह जोन्स 1.63 टक्के घसरणीत होता.

Advertisement
Tags :

.