स्टँडर्ड ग्लास लाइनिंगचा समभाग 22 टक्के वाढत सुचीबद्ध
172 रुपयांवर लिस्ट : लक्ष्मी डेंटलचा आयपीओ खुला
वृत्तसंस्था/ मुंबई
स्टॅंडर्ड ग्लास लाइनिंग यांचा समभाग सोमवारी शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध झाला आहे. कंपनीचा समभाग एनएसईवर 22 टक्के वाढत 172 रुपयांवरती सुचीबद्ध झाला होता. हाच समभाग बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईवरती 25 टक्के वाढत 176 रुपयांवरती सुचीबद्ध झाला होता. कंपनीने समभागाची इशू किंमत 140 रुपये इतकी ठेवली होती. सदरचा समभाग गुंतवणुकीसाठी 6 जानेवारी रोजी खुला झाला होता आणि 8 जानेवारीपर्यंत त्यामध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. 410 कोटी रुपये कंपनीला या आयपीओच्या माध्यमातून उभारायचे आहेत. 210 कोटी रुपयांचे समभाग कंपनीने विक्रीसाठी ठेवले होते.
काय करते कंपनी
फार्मास्युटिकल कंपन्यांसाठी अभियांत्रिकी उपकरणे बनवण्यामध्ये कंपनी कार्यरत आहे. 2012 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती.
लक्ष्मी डेंटलचा आयपीओ खुला
शेअर बाजारात लक्ष्मी डेंटल लिमिटेड यांचा आयपीओ सोमवारी खुला झाला आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 15 जानेवारीपर्यंत बोली लावता येणार आहे. सदरचा कंपनीचा समभाग 20 जानेवारी रोजी बीएसई आणि एनएसई या दोन्ही बाजारांमध्ये सूचीबद्ध होणार आहे. 698 कोटी रुपये आयपीओअंतर्गत उभारले जाणार असून 560 कोटींचे समभाग गुंतवणूकदार विक्री करत आहेत. याचप्रमाणे 138 कोटींचे ताजे समभाग विक्रीसाठी खुले करण्यात येणार आहेत.