For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा निकाल पाहून शेअर बाजार गडगडला

06:14 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभा निकाल पाहून शेअर बाजार गडगडला
Advertisement

मुंबई  /प्रतिनिधी

Advertisement

लोकसभा निवडणुकीचे निकालाचा चांगला परिणाम शेअर मार्पेटच्या वफद्धीत होईल असे वाटत असतानाच निकाल येताच शेअर मार्पेटमध्ये मोठी घसरण झाल्याचे आढळून आले. गुंतवणूकदार मोठ्या उलाढालीच्या तयारीत होते. मात्र, मतमोजणीला सुऊवात झाली, एकेक कल समोर आले आणि शेअर मार्पेट दाणकन कोसळले. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार आता धास्तावले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार भाजपा प्रणित आघाडीचे सरकारच पेंद्रात येणार असल्याचा अंदाज होता. पण, मतमोजणीनंतर आकडे या अंदाजाला पाठबळ देताना दिसत नाहीत. वास्तविक, भाजपा स्वत:च संपूर्ण बहुमत घेऊन सरकार स्थापन करेल, असा अंदाज होता. पण, वास्तवात तसे काहीही दिसत नाही. यामुळे गुंतवणूकदार आता घाबरले आहेत. यामुळे ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 6 हजार अंकांपेक्षा जास्त अंकाने खाली आला. तर निफ्टीमध्ये देखील 1 हजार अंकांपेक्षा जास्त घसरण झाली.

Advertisement

सेन्सेक्सच्या पडझडीनंतर तज्ञांचे म्हणणे आहे की, एनडीएच्या जागा जर 300 पेक्षा कमी असतील तर मार्पेटमध्ये शॉर्ट टर्म पडझडीची सुऊवात होऊ शकते. वेल्थमिल्स सिक्योरिटीजच्या तज्ञांचे म्हणणे आहे की, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला जवळपास 350 जागा मिळण्याचा अंदाज होता. जर या जागा 300 पेक्षाही कमी आल्या तर गुंतवणूक करण़ार्या गुंतवणूकदारांची मोठी निराशा होणार आहे. स्टॉक मार्पेटमध्ये बँकिंग, पीएसयू शेअर शिवाय पॉवर आणि एनर्जी शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.

कोविडनंतर ज्या लोकांनी नव्याने गुंतवणुकीस सुऊवात केली, त्यांच्यासाठी हा धक्का असू शकतो. त्यांना लगेच मार्पेटचा अंदाज येणे शक्य नाही. यामुळे त्यांचे नुकसान झाले असू शकते. शेअर मार्पेटसाठी संशोधन आणि रिस्क मॅनेजमेंटचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. दरम्यान, मार्पेट पडल्यावर गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी घाई करू नये, असेही तज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.