महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सलग तिसऱ्या सत्रात शेअरबाजार दमदार तेजीत

06:32 AM Dec 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 597 अंकांनी तेजीत, अदानी पोर्टस, एनटीपीसी नफ्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय शेअर बाजार मंगळवारी दुसऱ्या सत्रामध्ये तेजीसमवेत बंद होण्यामध्ये यशस्वी झाला आहे. सेन्सेक्स निर्देशांक 597 अंकांनी वाढत बंद झाला. बँकिंग,  मेटल आणि ऑईल कंपन्यांच्या समभागांनी मंगळवारी दमदार कामगिरी नोंदवली.

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 597 अंकांनी वाढत 80845 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 181 अंकांनी वाढत 24457 च्या स्तरावर बंद झाला. जागतिक बाजारातील मिळत्याजुळत्या वातावरणाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 समभाग तेजीसोबत बंद झाले असून 5 समभाग घसरणीसोबत बंद झाले. अदानी पोर्टस, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि एल अँड टी यांचे समभाग सर्वाधिक तेजीत पहायला मिळाले. या सोबतच बाजाराला तेजीत ठेवण्यामध्ये अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएच, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवरग्रीड कॉर्प, इन्फोसिस, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, एचयूएल आणि मारुती सुझुकी यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला.

निफ्टीतील 50 पैकी 41 समभाग तेजीसमवेत तर 9 समभाग घसरणीसोबत बंद झाले. भारती एअरटेल, आयटीसी, एशियन पेंटस्, सनफार्मा आणि कोटक बँक यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता एफएमसीजी आणि फार्मा निर्देशांक वगळता बाकी सर्व निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले. निफ्टी मिडकॅप-100 आणि निफ्टी स्मॉल कॅप-100 निर्देशांक अनुक्रमे 0.89 टक्के, 0.84 टक्के वाढीसोबत बंद झाले. पीएसयू बँक आणि मीडीया निर्देशांक 2 टक्के वाढीसोबत दमदार कामगिरी करत होता. यानंतर बँक निफ्टी, ओएमसी आणि धातू निर्देशांक 1 टक्के वाढीसोबत बंद झाले. सलग तिसऱ्या सत्रामध्ये सेन्सेक्सने तेजी कायम ठेवली आहे. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 445 अंकांनी तर निफ्टी 144 अंकांनी वाढत बंद झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article