डिझेलची मागणी वाढली, इतर इंधनाची मागणी वाढीवच
नवी दिल्ली :
डिझेल विक्रीमध्ये नोव्हेंबर महिन्यात 8.4 टक्के इतकी वाढ दिसून आली आहे. डिझेलच्या वापरामध्ये मागच्या महिन्यामध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता ही वाढ झाल्याची माहिती तेल कंपन्यांनी दिली आहे. पेट्रोल विमानाचे इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या विक्रीतही नोव्हेंबरमध्ये चांगली वाढ दिसून आली. पेट्रोलची विक्री 9.2 टक्के वर्षाच्या आधारावर वाढली. नव्या वाहनांच्या खरेदीमुळे ही वाढ दिसून आल्याचे सांगितले जात आहे.
जेट फ्यूलची मागणी वाढली
त्याचप्रमाणे विमानाच्या इंधनाची विक्रीसुद्धा 7.7 टक्के इतकी वाढली आहे. हवाई वाहतुकीमध्ये झालेली वाढ यामुळे ही विक्री वाढल्याचे बोलले
जात आहे. स्वयंपाकाच्या गॅसची मागणीसुद्धा मागच्या महिन्यात 7.3 टक्के इतकी वाढली आहे. विविध इंधनांचा विचार करता देशामध्ये डिझेलचा वापर सर्वाधिक 40 टक्के इतका केला जातो.