कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेअर बाजार सलग सातव्या दिवशी तेजीत

06:28 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्सची 521 अंकांची उसळी : वाहन क्षेत्राची चमक

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात व शेअर बाजाराच्या सलग सातव्या दिवशी तेजीच्या कामगिरीसह बाजार बंद झाला आहे. यामध्ये आयटी आणि वाहन क्षेत्रांची चमक राहिल्याचे दिसून आले. जागतिक बाजारपेठेत नकारात्मकता असूनही, भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. देशातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी सेवा कंपनी एचसीएल टेकचे समभाग हे 7.7 टक्क्यांनी वाढले. ज्यामुळे कंपनी निफ्टी 50 निर्देशांकात सर्वाधिक वाढणारी कंपनी म्हणून उदयास आली. याशिवाय, निफ्टी आयटी निर्देशांकात 4.3 टक्के वाढ झाली.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 520.90 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 80,116.49 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 161.70 अंकांच्या मजबूतीसह निर्देशांक 24,328.95 वर बंद झाला आहे. दरम्यान मजबूत कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा आणि कोफोर्ज सारख्या दिग्गज कंपन्यांनी 2.7 टक्के ते 6.4 टक्क्यांदरम्यान वाढ नोंदवली.

निफ्टीमध्ये वाहन क्षेत्राचा निर्देशांक 2.4 टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे, सेन्सेक्समधील चांगली कामगिरी करणाऱ्या समभागांमध्ये एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, इन्फोसिस आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचा समावेश आहे.

जागतिक बाजारातील चित्र

आशियाई बाजारपेठेत, जपानचा निक्केई 648 अंकांनी (1.89 टक्क्यांनी) वधारला आणि 34,868 वर बंद झाला. कोरियाचा कोस्पी 39 अंकांनी (1.57टक्क्यांसह) वधारला आणि 2,526 वर बंद झाला. चीनचा शांघाय कंपोझिट 0.027 टक्केनी वधारला आणि 3,296 वर बंद झाला. हाँगकाँगचा हँग सेंग इंडेक्सने 2.37टक्क्यांची तेजी प्राप्त केली आहे. 22 एप्रिल रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी 1,290.43 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले असल्याची माहिती आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article