बँकिंग-तेल कंपन्यांमुळे शेअरबाजार सावरला
सेन्सेक्स 123 तर निफ्टी 32 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/मुंबई
जागतिक बाजारपेठेतील संमिश्र वातावरणामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजार वधारला. यामध्ये बँकिंग आणि तेल आणि वायूशी संबंधित कंपन्यांच्या मजबुतीमुळे तेजीची नोंद करण्यात आली आहे. याच वेळी, अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापाराबाबत पुन्हा एकदा चर्चेची मालिका सुरू झाल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. बीएसई सेन्सेक्स 200 अंकांपेक्षा जास्त घसरून 81,217.30 वर उघडला. अंतिम क्षणी 123.58 अंकांच्या वाढीसह 81,548.73 अंकांवर बंद झाला. याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32.40 अंकांनी वाढून 25,005.50 वर बंद झाला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, इटर्नल, पॉवर ग्रिड आणि भारती एअरटेल हे प्रमुख वधारले होते. हे समभाग 1.60 टक्केपर्यंत वाढले. त्याच वेळी, इन्फोसिस, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि बीइएल हे प्रमुख तोट्यात होते. निफ्टी ऑइल अँड गॅस आणि मीडिया इंडेक्स हे क्षेत्रीयदृष्ट्या आघाडीचे वाढणारे होते, जे 1 टक्केपेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. याशिवाय, एनएसईवरील सर्व बँकिंगशी संबंधित निर्देशांक तेजीसह बंद झाले. याउलट, निफ्टी आयटी, ऑटो आणि कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक तोट्यात राहिले.
भारत-अमेरिका व्यापार करार पुन्हा रुळावर
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरील वाटाघाटींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दीर्घकालीन समस्यांचे निराकरण आणि शक्य तितक्या लवकर व्यापार चर्चा पूर्ण होण्याची आशा व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की दोन्ही देशांमधील व्यापार अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू आहे. येत्या आठवड्यात मोदींना भेटण्याची त्यांची अपेक्षा आहे असेही ते म्हणाले. मोदींनीही दोन्ही देशांचे संघ लवकरात लवकर व्यापार चर्चा पूर्ण करण्यासाठी काम करत असल्याचे म्हटले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एनटीपीसी 331
- अॅक्सिस बँक 1087
- पॉवरग्रिड कॉर्प 286
- इटर्नल 328
- भारती एअरटेल 1912
- सनफार्मा 1609
- स्टेट बँक 823
- एशियन पेंट्स 2559
- आयटीसी 415
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1383
- टीव्हीएस 3123
- अदानी पोर्ट 1393
- बजाज फायनान्स 970
- एचसीएल टेक 1467
- टाटा स्टील 169
- श्रीराम फायनान्स 620
- आयओसी 143
- ब्रिटानिया 6285
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इन्फोसिस 1509
- टायटन 3580
- अल्ट्राटेक सिमेंट 12377
- हिंदुस्थान युनि 2621
- भारत इलेक्ट 385
- टेन्ट 5168
- टाटा मोटर्स 705
- लार्सन-टुब्रो 3539
- टेक महिंद्रा 1520
- महिंद्रा-महिंद्रा 3595
- आयसीआयसीआय 1401
- मारुती सुझुकी 15111
- कोटक महिंद्रा 1972
- बजाज फिनसर्व्ह 2037
- कोलगेट 2373
- अंबुजा सिमेंट 560
- आयशर मोटर्स 6758
- हिरोमोटो 5301
- एचडीएफसी 774
- अपोलो हॉस्पिटल 7890
- श्री सिमेंट 29850
- मॅरिको 734
- डिव्हीस लॅब 6024