For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक संकेतामुळे शेअर बाजार पुन्हा घसरणीत

11:30 AM May 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
जागतिक संकेतामुळे शेअर बाजार पुन्हा घसरणीत
Advertisement

सेन्सेक्स 644 अंकांनी घसरला : गुंतवणूकदारांनी 2 लाख कोटी गमावले

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

चालू आठवड्यात चौथ्या दिवशी गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात  जागतिक बाजारपेठेत कमकुवत स्थिती राहिल्याचा नकारात्मक परिणाम झाला. यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. मुख्य कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये घसरण झाली. बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स खाली आणण्यात इन्फोसिसची मोठी भूमिका होती. दरम्यान वाहन आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेली घसरण सर्वाधिक होती. तथापि, एका वेळी निर्देशांक 1.25 टक्क्यांनी नुकसानीत होता. परंतु शेवटी बाजारात काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. सेन्सेक्स गुरुवारी 270 अंकांपेक्षा जास्त घसरून 81,323 वर उघडला. दिवसअखेर, सेन्सेक्स 644.64 अंकांनी घसरून निर्देशांक 80,951.99 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 203.75 अंकांनी घसरून 24,609.70 वर बंद झाला.

Advertisement

घसरण होण्याची तीन कारणे?

  • गुरुवारीआशियाईबाजारात घसरण दिसून आली. बुधवारी वॉलस्ट्रीट घसरल्यानंतर, अमेरिकेतील वाढत्या आर्थिक चिंतांमुळे गुंतवणूकदार सावध राहिले. जपानचा निक्केई 0.7 टक्क्यांहून अधिक घसरला.
  • आंतरराष्ट्रीयनाणेनिधी(आयएमएफ) च्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी इशारा दिला आहे की अमेरिका खूप मोठी वित्तीय तूट सहन करत आहे आणि त्याच्या वाढत्या कर्जाच्या बोजावर त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
  • निफ्टीमीडियावगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात होते. निफ्टी ऑटोमध्ये सर्वाधिक 1.4 टक्के घसरण झाली. त्यानंतर निफ्टी एफएमसीजी आणि आयटीमध्ये अनुक्रमे 1.27 टक्के आणि 1.11 टक्के घसरण झाली. फार्मा, पीएसयू बँका, खाजगी बँका आणि तेल आणि वायूसह इतर क्षेत्रांमध्येही 0.5 ते 1 टक्क्यांची घसरण झाली.

समभाग वधारलेल्या कंपन्या

  • भारती एअरटेल 1830
  • अल्ट्राटेक सिमेंट 11671
  • टीव्हीएस मोटार 2806
  • गेल 192
  • मॅक्स हेल्थकेअर 1151
  • जेएसडब्ल्यू स्टील 1006
  • बजाज ऑटो 8733
  • अदानी पॉवर 553
  • सिमेन्स 3304
  • हिरोमोटो 4277
  • कमिन्स 2984
  • बँक ऑफ बडोदा 241
  • आयशर मोटर्स 5412

समभाग घसरलेल्या कंपन्या

  • महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 3007
  • टेक महिंद्रा 1569
  • बजाज फिनसर्व्ह 2000
  • पॉवरग्रिड कॉर्प 291
  • आयटीसी 426
  • रिलायन्स इंडस्ट्रीज 1409
  • हिंदुस्थान युनि 2331
  • एनटीपीसी 341
  • मारुती सुझुकी 12445
  • टीसीएस 3479
  • टाटा मोटर्स 717
  • नेस्ले 2361
  • इन्फोसिस 1549
  • लार्सन अॅण्ड टुब्रो 3550
  • एचसीएल टेक 1637
  • टायटन 3546
  • अॅक्सिस बँक 1187
  • सनफार्मा 1722
  • बजाज फायनान्स 9140
  • एशियन पेन्ट्स 2299
  • इटरनल 229
  • एचडीएफसी बँक 1920
  • स्टेट बँक 785
  • टाटा स्टील 161
  • आयसीआयसीआय 1442
  • कोटक महिंद्रा 2068
  • कोलगेट 2486
  • विप्रो 245
Advertisement
Tags :

.