कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोमवारी शेअरबाजाराची चमक कायम

06:34 AM Apr 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 855 अंकांनी वधारला : आयटी, बँकिंग समभाग चमकले

Advertisement

मुंबई :

Advertisement

आशियाई बाजारात नरमाई असतानाही भारतीय शेअरबाजाराची सोमवारची चमक अधिकच वाढलेली दिसून आली. सेन्सेक्स 855 तर निफ्टी 273 अंकांच्या वाढीसह बंद झाले. बँक निफ्टी निर्देशांकाने सर्वकालीक उच्चांकी स्तर गाठला तर ऑटो व आयटी निर्देशांकांनीही बाजाराला मजबुत साथ दिली.

सोमवारी सरतेशेवटी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 855 अंकांनी मजबूत वाढत 79408 अंकांवर बंद झालेला दिसून आला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकही 273 अंकांच्या तेजीसह जोशात 24125 अंकांवर बंद झालेला पाहायला मिळाला. सोमवारी सलग पाचव्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. आयसीआयसीआय बँक व एचडीएफसी बँक या दिग्गज बँकांच्या समभागांनी दमदार तेजीसह बाजाराला वाढण्यास सहाय्य केले. एकावेळी सेन्सेक्सने 79635 या स्तरावर मजल मारली होती. निफ्टी एकावेळी 24189 अंकांपर्यंत मजल मारली होती. सेन्सेक्समधील 30 पैकी 23 समभाग वाढत बंद झाले. यात टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज फिनसर्व्ह आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे समभाग 4.91 टक्के इतके वाढत बंद झाले आहेत. घसरणीत पाहता अदानी पोर्टस, एचयुएल, आयटीसी,भारती एअरटेल, सनफार्मा यांचे समभाग होते.

बाजारात तेजीची कारणे

  1. बँकांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक यांनी चांगली तेजी राखत निर्देशांकाला सर्वाधिक मजबुत करण्याचे श्रेय घेतले. मार्च तिमाहीतील कामगिरीमुळे समभाग 5 टक्के इतके वाढले.

2.भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार करारात यशाचे संकेत मिळाल्याने  याचाही परिणाम बाजारावर दिसला.

  1. बाजारातील तज्ञांच्या मते अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क युद्धाच्या स्थितीत भारतीय अर्थव्यवस्था ही चांगली स्थिती राखेल. या अंदाजाही बाजाराला लाभ झाला.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article