अखेरच्या दिवशी शेअरबाजार तेजीसह बंद
सेन्सेक्स 147 अंकांसह तेजीत : जागतिक स्थिती अस्थिरच
मुंबई :
अमेरिकेतील सरकारकडून टॅरिफ लावण्याच्या चिंतेमुळे जागतिक बाजारात घसरणीचा कल दिसत असला तरी भारतीय बाजार मात्र शुक्रवारी अखेरच्यादिवशी चांगल्या तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला. शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 607 अंकांनी वाढत 76955 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 154 अंकांनी वाढत 23345 अंकांवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप निर्देशांकदेखील 714 अंकांनी वाढत व्यवहार करत होता. सकाळच्या सत्रामध्ये सेन्सेक्स 200 अंकांनी घसरत 76155 च्या स्तरावर खुला झाला होता. मात्र त्यानंतर सेन्सेक्सने तेजीकडे वाटचाल सुरु केली. निफ्टी निर्देशांकसुद्धा 23168 अंकांवर घसरणीसह खुला झाला होता.
शुक्रवारच्या सत्रामध्ये सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचा समभाग सर्वांधिक तेजीत पहायला मिळाला. या तेजीला साथ देण्यामध्ये सनफार्मा, अदानी पोर्ट, कोटक महिंद्रा बँक, पावर ग्रीड कॉर्प, नेस्ले इंडिया, लार्सन टूब्रो, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, महिंद्र आणि महिंद्रा, टाटा मोटर्स यांनीही सहभाग नोंदवला होता. दुसरीकडे इन्फोसिस, टायटन, झोमॅटो, टेक महिंद्र, एअरटेल, अल्ट्रा टेक सिमेंट आणि हिंदुस्थान यूनिलिव्हर यांचे समभाग घसरणीत राहिले होते. गुरुवारी विदेशी गुंतवणुकदारांनी 3239.14 कोटी रुपये मुल्यांचे समभाग बाजारात खरेदी केले होते. तर दुसरीकडे देशांतर्गत गुंतवणुकदारांनी 3136.02 कोटी रुपये मुल्यांचे समभाग विकले होते. मागच्या सत्रात सेन्सेक्स निर्देशांक 1.19 टक्के वाढीसह 76348 अंकांवर तर निफ्टी 1.24 टक्के वाढत 23190 अंकांवर बंद झाला होता. गुरुवारी अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरामध्ये कोणताही बदल न करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विदेशातील बाजारामध्ये तेजी कमी झालेली दिसून आली. एस अँड पी निर्देशांक, नॅसडॅक निर्देशांक तसेच डोजोन्स निर्देशांकही घसरणीत राहिले होते. आशियायी बाजारामध्ये मिळताजुळता कल पहायला मिळाला. जपानचा निक्केई 225 अंकांनी वाढलेला होता. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी मात्र घसरणीत होता. सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजी राखत बंद झाला. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये मजबूत झालेला दिसून आला.