महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्टीव्ह स्मिथ पुन्हा नडला, ऑस्ट्रेलियाच्या 474 धावा

06:57 AM Dec 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसऱ्या दिवसअखेर 5 बाद 164 धावा : जैस्वालचे शतक हुकले

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisement

एमसीजी ग्राऊंडवर सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व पहायला मिळाले. अनुभवी स्टीव्ह स्मिथच्या कसोटीतील 34 व्या शतकी खेळीच्या जोरावर कांगारुंनी पहिल्या डावात 474 धावा केल्या. यानंतर पहिल्या डावात खेळताना टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताने 5 बाद 164 धावा केल्या टीम इंडिया अद्याप 310 धावांनी पिछाडीवर आहे. दिवसअखेरीस ऋषभ पंत 6 तर रविंद्र जडेजा 4 धावांवर खेळत आहेत. विशेष म्हणजे, टीम इंडियावर फॉलोऑनचे संकट असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना 111 धावांची गरज आहे. आजच्या दिवशी भारतीय संघ फॉलोऑनचे संकट टाळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 6 गडी गमावत 311 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी नाबाद राहिलेल्या स्टीव्ह स्मिथ व पॅट कमिन्स यांनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात दमदार केली. या जोडीने सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला चारशेचा टप्पा गाठून दिला. यादरम्यान, स्मिथने आपले कसोटीतील 34 वे शतक साजरे करताना 197 चेंडूत 13 चौकार व 3 षटकारासह 140 धावा केल्या. पॅट कमिन्सने 7 चौकारासह 49 धावांचे योगदान दिले. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. जडेजाने त्याला बाद करत ही जोडी फोडली. कमिन्स बाद झाल्यानंतर स्मिथने मिचेल स्टार्कसोबत आठव्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या व संघाला 450 च्या पुढे नेले. स्टार्कचा अडथळा जडेजाने दूर केला. तर नॅथन लियॉनने 13 धावा केल्या. त्याला बुमराहने तंबूत पाठवले. शेवटी स्मिथला आकाशदीपने बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. कांगारुंनी पहिल्या डावात 122.4 षटकांत 474 धावा केल्या. भारताकडून बुमराहने 4 तर जडेजाने 3 गड्यांना तंबूत पाठवले.

रोहित पुन्हा फ्लॉप, जैस्वालचे शतक हुकले

भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा रोहित शर्मा सलामीवीर म्हणून खेळला. मात्र, तो अवघ्या 3 धावा करून बाद झाला. फॉर्मच्या शोधात असलेला रोहित मागील चार डावात सपशेल अपयशी ठरला आहे. या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण कमिन्सने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर केएल राहुल सलामीवीर यशस्वी जैस्वाल फलंदाजीसाठी आला. केएल व जैस्वाल ही जोडी जमलेली असताना चहापानाच्या विश्रांतीपूर्वी शेवटच्या चेंडूवर पॅट कमिन्सने केएलला क्लीन बोल्ड झाले. त्याने 3 चौकारासह 24 धावा फटकावल्या.

तिसऱ्या सत्रात विराट कोहली यशस्वीला साथ देण्यासाठी क्रीजवर आला. दोघांमध्ये 100 धावांची भागीदारी झाली. जैस्वालने अर्धशतकी खेळी साकारताना 118 चेंडूत 11 चौकार व 1 षटकारासह 82 धावा केल्या. पण 41 व्या षटकात तो धावबाद झाला. एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. जैस्वालपाठोपाठ विराटलाही स्कॉट बोलँडने बाद केले. विराट कोहलीला 36 धावा करता आल्या. भारताची दिवसातील शेवटची विकेट आकाश दीपच्या रूपाने पडली. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला असून ऋषभ पंत 6 तर जडेजा 4 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स व स्कॉट बोलँडने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

.संक्षिप्त धावफलक :

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 122.4 षटकांत सर्वबाद 474 (कॉन्स्टास 60, उस्मान ख्वाजा 57, लाबुशेन 72, स्टीव्ह स्मिथ 140, पॅट कमिन्स 49, बुमराह 4 तर जडेजा 3 बळी)

भारत 46 षटकांत 5 बाद 164 (यशस्वी जैस्वाल 82, रोहित शर्मा 3, केएल राहुल 24, विराट कोहली 36, पंत खेळत आहे 6, जडेजा खेळत आहे 4, कमिन्स व स्कॉट बोलँड प्रत्येकी दोन बळी).

जैस्वालने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा सलामीवीर जैस्वालने 82 धावांची शानदार खेळी साकारली. पण चुकीच्या कॉलमुळे शेवटी तो धावबाद झाला. जैस्वालने आपल्या खेळीसह भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडले. सचिनने 2002 मध्ये 1392 धावा केल्या होत्या. यशस्वीने 2024 मध्ये 1394 धावा करत आता सचिनला मागे टाकले आहे. या यादीत वीरेंद्र सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे. सेहवागने 2010 मध्ये 1562 धावा केल्या होत्या.

स्मिथचा अनोख विक्रम, सचिन-विराटला टाकले मागे

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध 140 धावांची महत्वपूर्ण शतकी खेळी साकारली. या शतकी खेळीसह तो बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात विराट आणि सचिनला मागे टाकत सर्वाधिक शतके झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यात शतक झळकावताच तो बॉर्डर2-गावसकर ट्रॉफीत 10 शतके पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. स्मिथने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचा नऊ शतकांचा विक्रम मोडला असून तो आता 10 शतकांसह बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे.

याशिवाय, स्टीव्ह स्मिथच्या कारकिर्दीतील हे 34 वे कसोटी शतक आहे. अशा परिस्थितीत स्मिथ (11) आता भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने जो रुटला मागे टाकले आहे. रुटने आपल्या कसोटी कारकिर्दीत भारताविरुद्ध 10 शतके झळकावली आहेत. रिकी पाँटिंग भारताविरुद्ध 8 शतके झळकावण्यात यशस्वी ठरला होता.

टीम इंडियाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी 26 डिसेंबरच्या रात्री निधन झाले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध एमसीजी येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. भारतीय संघाने माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article