महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहा

11:46 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नगरसेवक महेश आमोणकर यांचे मडगाव पालिका क्षेत्रातील तरुणांना आवाहन

Advertisement

मडगाव : मडगाव पालिकेतील प्रभाग 15 चे नगरसेवक महेश आमोणकर यांनी आपल्या प्रभागासह पालिका क्षेत्रातील तऊणांना गांजा व इतर अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या प्रभागाबरोबरच शहरातील वेगवेगळ्या विषयांवर आवाज उठवणारे आमोणकर यांनी गांजाच्या व्यसनाच्या आधीन झालेल्या तऊणांना या  विळख्यातून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मडगावमधील काही विशिष्ट ठिकाणी तऊण गांजा व इतर अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे सांगण्यात येत असून चांगल्या कुटुंबातील मुलेही गांजाच्या नादी लागल्याची उदाहरणे आढळून येत आहेत. कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या या व्यसनापासून तऊणांनी दूर राहावे अशी कळकळीची विनंती नगरसेवक आमोणकर यांनी नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर केली आहे. चांगल्या कुटुंबातील मुले व्यसनाधीन होताना पाहवत नाहीत. गांजाच्या आहारी गेलेल्या मुलांची कुटुंबे उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. या मुलांनी आपल्या कुटुंबाची वाताहत करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपण प्रतिनिधीत्व करत असलेल्या मडगावच्या प्रभाग 15 च्या कोणत्याही भागात असे तऊण आढळल्यास आपण कोणतीही दयामाया दाखवणार नाही. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशाराही आमोणकर यांनी दिला आहे. दुसऱ्या प्रभागांतील अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तऊणांनीही या प्रभागात फिरकण्याचे धाडस करू नये, असा इशाराही आमोणकर यांनी विविध समाजमाध्यमांतील ग्रुपवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओतून दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article