महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बामणाव्हाळी हेडलॅण्ड-सड्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

12:00 PM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वास्को : बामणाव्हाळी हेडलॅण्ड-सडा येथील श्री दत्तात्रय सेवा धामच्या श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या किल्यावरील श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला स्थानिक आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, नगरसेवक तसेच अॅङ राजीव ढवळीकर, मुंबई येथील कलाकार किशोर मेस्त्री, डॉ. विनय मडगावकर, पुतळा साकारलेले रोषन व रोहन तळावडेकर बंधू, पवित्रक युवा कला मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक, पुष्पहार व पुष्पदल अर्पण करून महाराजांना मानवंदना देण्यात आली. आमंत्रीत मान्यवर आमदार दाजी साळकर व आमदार संकल्प आमोणकर यांनी पुरूष, महिला व युवकांनी मिळून श्रमदानातून केलेल्या या कार्याबद्दल त्यांना शाबासकी दिली. तसेच त्यांचे अभिनंदनही केले.

Advertisement

शिवोली येथील डॉ. विनय मडगावकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्म टिकविण्यासाठी केलेल्या कार्याची तसेच गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत हिंदूवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त करण्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची थोडक्यात माहिती दिली. तद्नंतर मुंबई येथील किशोर मेस्त्री यांनी सवेष ऐतिहासिक एकपात्री प्रयोग सादर केला. सुरवातीला अजित कांबळी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सवागत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ नाईक यांनी केले तर संजय मेस्त्री यांनी आभार मानले. दत्तजयंतीनिमित्त आज मंगळवार दि. 26 रोजी सकाळी 7.30 वा. शुद्धीहोम, आरती, 9 वा. भजनाचा कार्यक्रम, दुपारी 12 वा. आरती, महाप्रसाद, सायंकाळी 5 वा. श्री दत्तात्रेय जन्म सोहळा (यजमान : श्री. व सौ. मनिषा राजीव ढवळीकर), 6.30 वा. भजन व रात्री 9.30 वा. आरती होऊन उत्सवाची सांगता होईल. उत्सवातील कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पवित्रक युवा कला मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article