For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सोलापूर स्थानकावर स्थानक महोत्सवाचे आयोजन ! सोलापूरकरांना पाहता येणार दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन

08:06 PM Nov 29, 2023 IST | Abhijeet Khandekar
सोलापूर स्थानकावर स्थानक महोत्सवाचे आयोजन   सोलापूरकरांना पाहता येणार दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन
Station festival organized Solapur station

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय रेल्वे भारताच्या आर्थिक विकासाची साक्षीदार आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावर शुक्रवार एक डिसेंबर रोजी स्थानक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास महोत्सव विनामूल्य आहे. सर्वांनी विशेषता शाळकरी मुलांनी जास्तीत जास्त संख्येने यावे आणि याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

या महोत्सवा दरम्यान सोलापूर रेल्वे स्थानकावरील मुख्य प्रवेशद्दार येथे विद्युत रोषणाई, स्क्रीन डिस्प्ले, सोलापूर विभागाने जतन केलेल्या दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन, सोलापुरातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू विक्रीसाठी स्टॉल, एचडीएफसी बँक आणि डॉ. हेडगेवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तसेच शाळकरी मुलांचे स्टेशन विकास, विकसनशील रेल्वे या विषयावर झालेली निबंध स्पर्धा, भाषण आणि ड्रॉइंग मध्ये प्राविण्य विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. या महोत्सवादरम्यान सोलापूर स्टेशनचे महत्त्व यातील विकासाबद्दल माहिती दिली जाणार आहे. विविध सांस्कृतिक गोष्टीची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. तरी या महोत्सवात प्रवासी, रेल्वे कर्मचारी, विद्यार्थी व विविध संस्थांचा सहभाग असणार आहे. या महत्त्वाचे उद्घाटन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.