For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्याचा दहावी निकाल 66.14 टक्के

06:28 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्याचा दहावी निकाल 66 14 टक्के
Advertisement

22 विद्यार्थ्यांना 625 पैकी 625 गुण : मंगळूर प्रथम तर कलबुर्गी जिल्हा शेवटच्या स्थानावर : मराठी माध्यमाचे 53.97   विद्यार्थी उत्तीर्ण

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

अनेक दिवसांपासून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष केंद्रित झालेल्या 2025 सालातील दहावी परीक्षा-1 चा निकाल अखेर जाहीर झाला. शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी शुक्रवारी सकाळी परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्याचा दहावी परीक्षा निकाल 66.14 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यंदा 22 विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. निकालात मंगळूर जिल्ह्याने अग्रस्थान राखले. तर उडुपी जिल्ह्याने दुसरा, कारवार जिल्ह्याने तिसरे स्थान पटकावले. कलबुर्गी जिल्हा शेवटच्या स्थानावर राहिला आहे.

Advertisement

राज्यात 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत 2,828 केंद्रांवर दहावी परीक्षा घेण्यात आली होती. 15 ते 26 एप्रिलदरम्यान मूल्यमापन झाले होते. 8,42,173 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मागील तीन वर्षांच्या दहावी निकालावर दृष्टीक्षेप टाकल्यास यंदा निकालात मोठी घसरण झाली आहे. मागील वर्षी म्हणजेच 2024 च्या दहावी परीक्षेचा निकाल 73.40 टक्के लागला होता. यंदा तो 66.14 टक्क्यांवर घसरला आहे.

दरवर्षीप्रमाणे दहावी परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांपेक्षा शहरी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णचे प्रमाण जास्त आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 74 टक्के तर मुलांचे उत्तीर्ण प्रमाण 58.07 टक्के आहे. शहरी विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण प्रमाण 67.05 टक्के तर ग्रामीण विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण प्रमाण 65.47 टक्के इतके आहे.

921 शाळांचा निकाल 100 टक्के

सरकारी शाळांचा एकूण दहावी निकाल 62.7 टक्के, अनुदानित शाळांचा निकाल 58.97 टक्के आणि विनाअनुदानित शाळांचा निकाल 75.59 टक्के इतका लागला आहे. 329 सरकारी शाळा, 53 अनुदानित आणि 539 विनाअनुदानित शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 6 सरकारी शाळा, 30 अनुदानित आणि 108 विनाअनुदानित शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

माध्यमनिहाय निकाल

कन्नड माध्यमाच्या दहावी विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण प्रमाण 57.61 टक्के, इंग्रजी माध्यम 78.38 टक्के, उर्दु माध्यम 46.46 टक्के, मराठी माध्यम 53.97 टक्के, तेलगू माध्यम 74.56 टक्के, तामिळ माध्यम 37.88 टक्के आणि हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण प्रमाण 53.72 टक्के इतके आहे. मराठी माध्यमातून 9,090 विद्यार्थी परीक्षेला हजर झाले होते. त्यापैकी 4,904 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विशेष श्रेणीत 55,066 विद्यार्थी उत्तीर्ण

दहावी परीक्षेत अ+ श्रेणीत (90 ते 100 टक्के गुण) 55,066 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अ श्रेणीत (80 ते 89 टक्के गुण) 96,536 विद्यार्थी, ब+ श्रेणीत (70 ते 79 टक्के गुण) 1,14,852 विद्यार्थी, ब श्रेणीत (60 ते 69 टक्के गुण) 1,26,541 विद्यार्थी, क+ श्रेणीत (50 ते 59 टक्के गुण) 1,09,762 विद्यार्थी आणि क श्रेणीत (35 ते 49 टक्के गुण) 20,318 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत मिळविण्यासाठी 2 मेपासून अर्ज करण्यास प्रारंभ झाला आहे. ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यासाठी 5 मे पर्यंत मुदत आहे. उत्तरपत्रिकांची फेरगुणमोजणी आणि फेरमूल्यमापनासाठी 4 मे ते 11 मे या कालावधीत अर्ज करता येतील.

26 मेपासून दहावी परीक्षा-2

दहावी परीक्षा-1 च्या निकालात वृद्धी करण्यासाठी आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी दहावी परीक्षा-2 आणि परीक्षा-3 घेतली जाणार आहे. दहावी परीक्षा-2 ही 26 मे ते 2 जून या कालावधीत तर दहावी परीक्षा-3 ही 23 जून ते  30 जून या कालावधीत घेतली जाणार आहे.

मागील निकालावर दृष्टीक्षेप

वर्ष                   टक्के

2024                 73.40

2023                  83.89

2022                  85.13

शैक्षणिक जिल्हानिहाय निकाल

क्र. जिल्हा                           टक्के

  1. मंगळूर                     91.12
  2. उडुपी                      89.96
  3. कारवार                   83.19
  4. शिमोगा                 82.29
  5. कोडगू                   82.21
  6. हासन                   82.12
  7. शिरसी                  80.47
  8. चिक्कमंगळू र        77.9
  9. बेंगळूर ग्रामीण       74.02
  10. बेंगळूर दक्षिण       72.3
  11. बेंगळूर उत्तर        72.27
  12. मंड्या                69.27
  13. हावेरी             69.03
  14. कोलार            68.47
  15. म्हैसूर            68.39
  16. बागलकोट       68.29
  17. गदग             67.72
  18. धारवाड         67.62
  19. विजयनगर      67.62
  20. तुमकूर         67.03
  21. दावणगेरे        66.09
  22. चिक्कबळ्ळापूर   63.64
  23. चित्रदुर्ग            63.21
  24. रामनगर              63.12
  25. बेळगाव           62.16
  26. चिकोडी              62.12
  27. चामराजनगर      61.45
  28. मधुगिरी            60.65
  29. बळ्ळारी              60.26
  30. कोप्पळ             57.32
  31. बिदर                 53.25
  32. रायचूर             52.05
  33. यादगिरी             51.6
  34. विजापूर            49.58
  35. कलबुर्गी             42.43
Advertisement
Tags :

.