प्रबुद्ध भारत नागरिक मंचतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कणेरी मठाच्या मठाधीशांवर बेळगाव जिल्हा प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे समाजबांधवांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. कणेरी मठाचे स्वामीजी हे त्यांच्या नैसर्गिक शेती, आरोग्य सेवा, सार्वजनिक सेवा व गुरुकूल पद्धतीने शिक्षणास प्रोत्साहन देत असून देशभर स्वामीजींची ख्याती आहे. स्वामीजींच्या जिल्हा प्रवेशबंदी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे त्यांच्यावरील जिल्हा प्रवेशबंदी मागे घेण्याची मागणी प्रबुद्ध भारत नागरिक मंचच्यावतीने करण्यात आली.
डॉ. रवी पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून काही लोकांनी राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समुदायात फूट पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे. डाव्या विचारसरणीचे लोक हिंदू समाजाचा अपमान करत आहेत. तसेच तेढ निर्माण करून समाजात दुफळी माजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच मानसिकतेतून कणेरी स्वामीजींच्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात गोंधळ माजविण्यात येत आहे. हे रोखण्यासाठी स्वामीजींवरील जिल्हा प्रवेशबंदी मागे घेण्याची मागणी करण्यात आली.